तनपुरेंनी स्वतःच्या राजकारणासाठी तीन गावांना वेठीस धरले : कर्डिलेंनी केला आरोप

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले ( Shivajirao Kardile ) यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात टीकेची तोफ डागली.
Shivaji Kardile News | Shivaji Kardile Latest News Updates
Shivaji Kardile News | Shivaji Kardile Latest News UpdatesSarkarnama

अहमदनगर - महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे नगरपरिषद स्थापनेसाठीचे आदेश दिले होते. हे आदेश देऊन तीन महिने होऊनही एकही रुपया या कामासाठी आलेला नसल्याने माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले ( Shivajirao Kardile ) यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात टीकेची तोफ डागली. ( Prajakt Tanpur captured the people of three villages for his own politics )

नगर तालुक्यातील नागरदेवळे वडारवाडी व बाराबाभळी ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपरिषद स्थापनेचा घाट घालत मोठ्या थाटात 5 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली परंतु नगरपंचायतची घोषणा होऊन तीन महिने उलटले तरीही अद्याप पर्यंत नगर पंचायत खात्यावर एक रुपयाचा निधी वर्ग झालेला नाही हा प्रकार माहितीच्या अधिकारात उघड झाला आहे, असा आरोपही कर्डिले यांनी केला आहे.

Shivaji Kardile News | Shivaji Kardile Latest News Updates
शिवाजी कर्डिले म्हणाले, राम शिंदेंना विधान परिषदेचे आमदार करा...

शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, आमदार तनपुरे यांनी स्वतःच्या राजकारणासाठी नागरदेवळे, बाराबाभळी व वडारवाडी ग्रामस्थांना वेठीस धरले आहे. आमदार तनपुरे व त्यांचे उत्साही कार्यकर्ते पदाधिकारी मात्र फक्त नगरपंचायत स्थापनेचा ढोल वाजवत मोठ्या विकास कामांची स्वप्ने दाखवण्यातच मशगुल राहिले व जनतेला वारेवार सोडले कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध नसल्यामुळे नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी गावातील विकासाचे प्रश्न प्रलंबित राहिलेत, असा आरोप कर्डिले यांनी केला.

Shivaji Kardile News | Shivaji Kardile Latest News Updates
खासदार विखे म्हणाले, कर्डिले होणार आमदार...

निधी उपलब्ध नसल्यामुळे विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. प्रत्यक्षात एकही जबाबदार अधिकारी नियुक्तीवर नव्हता परंतु माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून नागरिकांच्या दैनंदिन अडचणी प्रशासकीय समस्यासाठी येत असलेल्या अडचणींबाबत गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी विविध अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com