चांगल्याला चांगलं नाही म्हटलं तर पडळकर ‘प्रॉब्लेम’ तयार होतो : जयंत पाटलांचा टोला

नितीन गडकरींचे कौतुक करत जयंत पाटील यांची आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका
Gopichand Padlkar-Jayant Patil
Gopichand Padlkar-Jayant PatilSarkarnama

सांगली : खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांच्या काळात सांगली जिल्ह्यातील रस्ते चांगले झाले आहेत. त्याचे श्रेय संजय पाटील यांच्या माध्यमातून नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जाते. जे चांगले झाले आहे, त्याला आपण चांगले म्हटले नाही, तर पडळकर (Gopichand Padalkar) प्रॉब्लेम तयार होतात. त्यामुळे जे चांगलं आहे, त्याला चांगलंच म्हणायचं असतं. आपण थोडसं मन मोठं दाखवलं आणि चांगल्या गोष्टीचं कौतुक करायला लागलो की अनेक चांगल्या गोष्टी व्हायला लागतात. जे नितीन गडकरी यांच्यामुळे आम्ही सर्वांनी पाहिलेले आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला. (Praising Nitin Gadkari, Jayant Patil strongly criticized Gopichand Padalkar)

सांगली जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाचे उद्‌घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (ता. २६ मार्च) झाले. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते. जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, एखादा मंत्री नियम बाजूला ठेवून कसा पुढे जाऊ शकतो. नियमाला वळण देऊन धाडसाने काम कसं पूर्ण करू शकतो. फाईलमध्ये अडकत न बसता झपाट्याने रिझल्ट कसा देऊ शकतो, याचा आदर्श संपूर्ण देशात नितीन गडकरी यांनी घालून दिला आहे. आजपर्यंत रस्ते होतच होते. पण, संपूर्ण देशात दर्जेदार काम होणे सोपे नाही. आता ते अति वेगवान रस्ते करण्याचे कामही हाती घेत आहेत.

Gopichand Padlkar-Jayant Patil
राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग-व्यापार आघाडी दोन लाख तरुणांना पक्षाशी जोडणार

नितीन गडकरी यांनी बांधलेल्या रस्त्यावरून जात असताना आपण परदेशातून प्रवास करीत आहोत, असे वाटावे इतके दर्जेदार रस्ते त्यांनी बांधलेले आहेत. अनेक गोष्टींवर त्यांच्याशी आमचे पक्षीय मतभेद असतील. पण, रस्ते बांधणीचा एकमेव कार्यक्रम गडकरींच्या नेतृत्वाखाली झाला आहे, तो भारताच्या प्रगतीला प्रोत्साहन देणारा उत्तम कार्यक्रम आहे. आपण पूर्वी रस्त्याच्या कामाला महत्व देत नव्हतो. पण, युरोप, अमेरिकेची प्रगती तेथील रस्ते आणि रेल्वेच्या जाळ्यांमुळे झाली आहे. गडकरी हे महाराष्ट्रात मंत्री असताना रस्त्याबाबत प्रभावीपणे काम केले आहे. गडकरींनी हाती घेतलेले सर्व प्रकल्प वेगाने पूर्ण झाले आहेत, असेही पाटील यांनी आवर्जून सांगितले आहे.

Gopichand Padlkar-Jayant Patil
आता काँग्रेसच्या सतेज पाटलांचा नंबर; भाजप नेता करणार ईडीकडे तक्रार

जयंत पाटील म्हणाले की, पेठ नाक्यापासून सांगली रस्त्याचे निवेदन मी दिल्लीला गेल्यानंतर गडकरींना दिले हेाते. त्याविषयी आपण काही पावले टाकली आहेत. त्याच्याविषयी आपण बोलालच. मी त्यावर जास्त बोलणे उचित ठरणार नाही. जिल्ह्यातील सर्व रस्ते, कोल्हापूर जाणारा रस्ता अर्धवट आहे, त्यावरही आपले लक्ष आहे. पेठनाक्याकडून येणारा रस्ता माझ्या मतदारसंघातून येतो, त्या भागातील लोकप्रतिनिधी म्हणून माझी विनंती आहे की, तो रस्ता आपण प्राधान्याने घ्यावा. सांगली जिल्ह्यात आम्ही विमानतळ करू शकलो नाही. ड्रायपोर्टच्या कामासाठी राज्य सरकारची दोनच दिवसांपूर्वी बैठक घेतली आहे. याबाबत राज्य सरकारची जी जबाबदारी असेल ती माझी राहील. पण, आपली त्यामध्ये मोठी भूमिका आहे. त्यामुळे हे रस्ते सांगली जिल्ह्याच्या विकासाला चालना देतील. देशाला ज्याची गरज होती, तेच खाते नितीन गडकरी यांच्याकडे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com