Praful Patel : राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात एक नंबरचा पक्ष होण्यासाठी मंथन व्हायला हवे

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात ते बोलत होते.
MP Prafull Patel
MP Prafull PatelSarkarnama

Praful Patel : ज्येष्ठ नेते शरद पवार हे सध्य स्थितीतील महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते आहेत. त्यांचा आदर्श विचार घेऊनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात एक नंबरचा पक्ष का झाला नाही. त्यासाठी मंथन व्हायला हवे. आपण सर्वांनी पक्षाचा उद्याचा काळ कसा असावा याची चर्चा झाली पाहिजे, अशी अपेक्षा माजी मंत्री प्रफुल्ल पटेल ( Praful Patel ) यांनी व्यक्त केली.

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृती बाबत आम्ही डॉक्टरांच्या संपर्कात होतो. त्यांच्या बाबत आता ऑल इज वेल असे म्हणावे लागेल. या पूर्वी अलिबागमध्ये पक्षाच्या झालेल्या चिंतन शिबिराचा फरक पडला. २०१९च्या विधानसभेत यश मिळाले. २०१४नंतर देशातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मृत्यूपासून २०१४पर्यंत सर्वपक्षांची आघाडी सरकारे होती. त्यामुळे एकच विचारधारा चालली नाही. त्यावेळची भाजप सरकार व आत्ताच्या सरकारमध्ये फरक आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या पंतप्रधान काळात ममता बॅनर्जी, चंद्रबाबू नायडू, उमर अब्दुल्ला केंद्रात मंत्री होते. आता तेच भाजपच्या विरोधात आहेत.

MP Prafull Patel
मोठी बातमी : राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडारवर; मुंबईतील घर जप्त?

ते पुढे म्हणाले की, २०१४नंतर राजकीय वातावरणाची निर्मिती झाली आहे. त्यांनी लोकांचे विचार चुकीच्या पद्धतीने का होईना पकडले आहेत. ते खोटे बोलत आहेत. लोकांची कामे करत नाहीत. मात्र लोकांच्या विचारांत बदल झाला आहे. हे आपल्याला समजून घेतले पाहिजे. काळाची पाऊले ओळखून चालले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

MP Prafull Patel
ही वेळ चुका काढण्याची नव्हे, तर संकटाशी लढण्याची : प्रफुल्ल पटेल 

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर १० जून १९९९ला शिवाजी पार्कवर मोळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्याचे वातावरण उल्हासपूर्ण होते. १९९९च्या निवडणुकीत विधानसभेच्या ५८ जागा मिळविल्या. त्यानंतर आपण खाली आलो. आपण सर्वांनी पक्षाचा उद्याचा काळ कसा असावा. याची चर्चा झाली पाहिजे. विदर्भाच्या ६० जागा व १२० जागा या दोन परिसरातील आहेत. धुळे व नंदुरबार जोडला तर विधानसभेच्या १३० जागा होतात. या जागात राष्ट्रवादीकडे मुंबई-ठाणे परिसरातील केवळ ४ जागा आहेत. विदर्भात ६ जागा आहेत. १३० पैकी केवळ १० जागा आहेत. उर्वरित १५८ जागांपैकी ४४ जागा आहेत. त्यामुळे या भागात भर दिला जावा. तसे केल्यास निश्चित पक्ष राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष होईल, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in