प्रभाकर घार्गे थेट कळंबा कारागृहातून मतदानासाठी वडुज केंद्रावर

राज्यात पहिल्यांदाच सातारा जिल्हा बँकेच्या Satara dcc bank election निवडणुकीत खटाव Khatav मतदारसंघातील खटाव विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार माजी आमदार प्रभाकर घार्गे Prabhakar Gharge हे कारागृहातून निवडून लढत आहेत.
प्रभाकर घार्गे थेट कळंबा कारागृहातून मतदानासाठी वडुज केंद्रावर
Prabhakar GhargeAyyaj Mulla, Shashikant Dhumal

निमसोड : जिल्हा बँकेच्या मतदानासाठी खटाव सोसायटी मतदारसंघातील उमेदवार प्रभाकर घार्गे आज न्यायालयाच्या परवानगीने कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून पोलिस बंदोबस्तात थेट वडुज (ता. खटाव) येथील मतदान केंद्रावर दाखल झाले. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता ताणली. तीन महिन्यानंतर माजी आमदार घार्गे यांना पाहून पत्नी इंदिरा व कन्या प्रीती घार्गे या त्यांना कडकडून भेटल्या. "आम्हाला काहीही नको. पप्पा, तुम्हीच आमची बँक आहात" असे भावनिक उद्‌गार कन्या प्रीती घार्गे यांनी काढले. त्यामुळे काही वेळ वातावरण स्तब्ध झाले.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी कित्येक उमेदवार कारागृहातुन निवडणूक लढविताना दिसून येतात. मात्र, राज्यात पहिल्यांदाच सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खटाव मतदारसंघातील खटाव विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार माजी आमदार प्रभाकर घार्गे हे कारागृहातून निवडून लढत आहेत. आज मतदानासाठी त्यांना न्यायालयाने एका दिवसांची परवानगी दिली. त्यामुळे ते मतदानासाठी सकाळी पोलिस बंदोबस्तात व पोलिसांच्या गाडीतूनच केंद्राबाहेर दाखल झाले.

Prabhakar Gharge
जिल्हा बँकेत डावलूनही सुनील माने म्हणतात, मी चुकीची भूमिका घेणार नाही...

कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून थेट वडूज (ता.खटाव) येथील मतदान केंद्रावर घार्गे आले. त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पत्नी इंदिरा घार्गे, कन्या प्रीती घार्गे, काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख, डॉ.दिलीप येळगावकर, आदी उपस्थित होते. सुमारे तीन महिन्यापासून कारागृहात अडकून पडलेले माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना केंद्राबाहेर आलेले पाहून पत्नी इंदिरा व कन्या प्रीती घार्गे या त्यांना कडकडून भेटल्या. त्यानंतर "आम्हाला काहीही नको. पप्पा, तुम्हीच आमची बँक आहात" असे भावनिक उद्‌गार कन्या प्रीती घार्गे यांनी काढले. त्यामुळे काहीकाळ वातावरण स्तब्ध झाले होते. मतदान केंद्रात जाऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते मतदान केंद्राच्या बाहेर थांबले होते. यावेळी त्यांचे समर्थकही उपस्थित होते.

Related Stories

No stories found.