प्रभाकर देशमुखांची खेळी यशस्वी; दहिवडी, वडूज नगरपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता

प्रभाकर देशमुख Prabhakar Deshmukh त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची NCP माण-खटाव Maan-Khatav या भागातील पकड मजबूत होवू लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
Sagar Pol, Prabhakar Deshmukh, Manisha Kale
Sagar Pol, Prabhakar Deshmukh, Manisha KaleMaan reporter

दहिवडी : माजी कोकण आयुक्त व माण-खटावचे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या पॅनेलची दहिवडी व वडूज नगरपंचायतीत सत्ता आली आहे. यामुळे प्रभाकर देशमुख यांचे नेतृत्व मजबूत होवू लागल्याचे चित्र आहे. दहिवडीच्या नगराध्यक्षपदी प्रभाकर देशमुख यांचे समर्थक राष्ट्रवादीचे युवा नेते सागर पोळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर वडूजच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी पुरस्कृत सौ. मनिषा काळे यांची बिनविरोध निवड होण्याची औपचारिकता बाकी आहे.

दहिवडीत अपक्षाच्या मदतीने तर वडूजमध्ये अपक्ष व वंचित बहुजन आघाडीच्या साथीने काठावरचे बहुमत असताना नगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाची कसोटी पाहणारी ठरली. पक्षांतर्गत मतभेद मिटवितानाच अपक्षांचा समेट घडविणे ही खुप अवघड गोष्ट होती. मात्र, आपला प्रशासनातील अनुभव पणास लावण्यासोबतच राजकीय कौशल्य वापरुन सर्वांची करकचून मोट बांधली.

Sagar Pol, Prabhakar Deshmukh, Manisha Kale
प्रभाकर देशमुख ठरवणार दहिवडीचा नगराध्यक्ष..!

त्यामुळे अनेक आमिषे दाखवून, दबाव वापरुन सुध्दा विरोधकांना प्रभाकर देशमुख यांनी बांधलेली मोळी सोडविण्यात विरोधकांना अपयश आले. त्यामुळे सरतेशेवटी नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून विरोधकांना माघार घ्यावी लागली. आज दहिवडीच्या नगराध्यक्षपदी प्रभाकर देशमुख यांचे समर्थक राष्ट्रवादीचे युवा नेते सागर पोळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपनगराध्यक्ष पदी राजेंद्र साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली.

Sagar Pol, Prabhakar Deshmukh, Manisha Kale
प्रभाकर देशमुख यांची राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर निवड

उद्या (शुक्रवारी) वडूजच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी पुरस्कृत मनिषा काळे यांची बिनविरोध निवड होण्याची औपचारिकता बाकी आहे. या निवडींमुळे माण-खटाव तालुक्यांच्या मुख्यालयाची ठिकाणे असणाऱ्या शहरांवर प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आली आहे. प्रभाकर देशमुख यांनी आखलेल्या कुशल रणनीतीला व उत्कृष्ठ नियोजनाला यामुळे यश आले त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची माण-खटाव या भागातील पकड मजबूत होवू लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com