Congress : आजादी गौरव पदयात्रेत दोन्ही काँग्रेस गटाचे शक्तिप्रदर्शन

श्रीरामपुरातही आमदार लहू कानडे व माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे ( Karan Sasane ) या दोन्ही गटांच्या वतीने या यात्रेद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
Karan Sasane Vs Lahu Kanade
Karan Sasane Vs Lahu KanadeSarkarnama

महेश माळवे

Congress : श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेसच्या वतीने राज्यात आजादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. श्रीरामपुरातही आमदार लहू कानडे व माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे ( Karan Sasane ) या दोन्ही गटांच्या वतीने या यात्रेद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. कानडे यांनी स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसच्या योगदानाबद्दल उहापोह केला, तर ससाणे गटाने खरी काँग्रेस कोणाची यावर बोट ठेवत कानडे यांना प्रथमच थेट टार्गेट केले.

आजादी गौरव पदयात्रेच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यात त्याग व बलिदान केलेल्या देशभक्तांची आठवणींना उजाळा दिला जात आहे. श्रीरामपुरात शुक्रवारी (ता. 12) आमदार कानडे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी चौकातून या यात्रेचा शुभारंभ होवून वडाळा महादेव येथे समारोप झाला. यावेळी तालुकाध्यक्ष अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, अंजुम शेख, राजेश अलघ, रवींद्र गुलाटी, अशोक कानडे, मुक्तार शहा, विजय शेळके, कलीम कुरेशी, अॅड. समीन बागवान, वंदना मुरकुटे, रज्जाक पठाण, अशोक बागुल, कार्लस साठे, अॅड. सर्जेराव कापसे, विष्णुपंत खंडागळे, वडाळ्याचे सरपंच कृष्णा पवार, अविनाश पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आमदार कानडे यांनी महात्मा गांधींच्या मिठाचा सत्याग्रह असो की, स्वातंत्र लढ्यातील काँग्रेसचे योगदान याचा उहापोह केला. तसेच भाजप सरकारकडून जीवनावश्यक वस्तूंवर लावण्यात आलेल्या कर व त्यांच्या धोरणांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

Karan Sasane Vs Lahu Kanade
श्रीरामपूरसाठी भानुदास मुरकुटे, करण ससाणे आले एकत्र

ससाणे गटाने शनिवारी (ता. 13) महात्मा गांधी पुतळ्यापासून पदयात्रेला सुरवात होवून मातोश्री मंगल कार्यालयात समारोप झाला. याठिकाणी झालेल्या सभेत आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत ससाणे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अंजुम शेख गटाशी वाढलेल्या जवळकीमुळे आमदार कानडे यांच्यावर उघडपणे प्रथमच घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यात्रेबाबत बोलताना गद्दारांना घेऊन फिरतात याची लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी तोंडसुख घेतले.

शेख गटावर टीका करताना यात्रेत तुम्ही टोप्या घालून सहभागी झाले. टोप्या घालणारी काँग्रेस आमची नाही. आमच्या संघटनेत ताकद नसल्याचा आरोप करणार्यांना आम्ही विसरणार नाही. तुमच्या हिम्मत होती, तर राजीनामे देऊन समोर उभे राहायचे मग आम्ही आमची ताकद दाखविली असती, असा घणाघात छल्लारे यांनी यावेळी केला. करण ससाणे, सचिन गुजर, मुजफ्फर शेख, श्रीनिवास बिहाणी, अण्णासाहेब थोरात, सुधीर नवले, बाबासाहेब दिघे, मुन्ना पठाण, आशिष धनवटे, भगवान उपाध्ये, राजेंद्र पाऊलबुद्धे, महंता यादव, हेमंत ओगले, गणेश गायधने उपस्थित होते.

Karan Sasane Vs Lahu Kanade
लहू कानडे म्हणाले, भांडवलदार मित्रांची घरे भरण्याची मोदींची नीती...

थोरातांना कॅसेट पाठविणार

आमच्याकडे रोजाने नव्हे तर काळजाने येणारे लोक आहेत. त्यांच्याकडचे ठेकेदार आम्हाला येवून रामराम करून त्यांना व्हिडीओ कॉल करतात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका येथील एक कॅसेट तुमच्याबरोबर थोरातांनाही पाठवून हे खरे काँग्रेसचे हे दाखवून देवू, असे छल्लारे यांनी यावेळी जाहीर केले. गेल्या अनेक दिवसांपासून कानडे व ससाणे गटात सुरू असलेल्या वादाला या निमित्ताने आणखी फोडणीच मिळाली असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com