
Nagar News : केंद्र सरकारच्या धोरणांमुळे एकापाठोपाठ शेतमालाचे भाव कोसळत असल्याबद्दल पारनेर तालुक्यातील जवळे गावात "शेतमालाचे भाव पाडल्याबद्दल पंतप्रधान मोदींच्या अभिनंदन" अशा आशयाचा उपरोधिक अर्थाने बॅनर लावल्याचा फोटो व्हायरल झाला होता. या बॅनरवरील मजकुरामुळे पारनेरसह सर्वत्र हा चर्चेचा विषय झाला होता.
बॅनरवर सर्वात खाली, "नवीन हिटलरशाही" असा उल्लेख आहे. या उल्लेखावर आता भाजपचे पारनेर तालुक्यातील नेते विश्वनाथ कोरडे यांनी प्रतिक्रिया दिली असून, देशात खरंच हिटलरशाही असती तर बॅनर लागला गेला असता का? असा प्रश्न उपस्थित करून उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार लोकशाही मानणारे आणि शेतकरी पूरक दिलासा देणारे निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे.
"टोमॅटोचे भाव पाडून झाल्यावर कांद्याचे भाव देखील पाडण्यासाठी तातडीने केलेल्या प्रयत्ना बद्दल मोदी सरकारचे अभिनंदन" अशा मजकुराचा एक बॅनर लावण्यात आला. पारनेर तालुक्यातील जवळे गावातील बाजारपेठेतील रस्त्यावर सध्या ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी शेतकरी संघटना आंदोलने करत आहेत. (Ahmednagar Politics)
या पार्श्वभूमीवर भाजप नेते कोरडे यांनी जवळे गावात लागलेल्या बॅनरच्या अनुषंगाने, देशात मोदी सरकार शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेत आले आहे. कांद्याला चांगला भाव शेतकऱ्यांना मिळावा म्हणून 2 लाख मेट्रिक टन कांदा 2 हजार 410 रुपयाने खरेदीचा स्वागतार्ह असा निर्णय घेतला गेला. मात्र केवळ विरोधाला विरोध म्हणून विरोधक आंदोलने करत असल्याचा आरोप केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने हिटलरशाही असे म्हणणे म्हणजे चुकीचा आणि दिशाभूल करणारा प्रकार आहे. जर खरंच हिटलरशाही असती तर असे फ्लेक्स जनता लावू शकली असती का, असाही सवाल त्यांनी विचारला आहेत. तसेच या देशात संविधानिक लोकशाही असल्यानेच विरोधक असा फ्लेक्स लावू शकले आहेत, हे विसरता येणार नाही. भाजप लोकशाही मानणारा पक्ष आहे. जवळे गावात लागलेला बॅनर भाजपने काढून टाकल्याच्या या बातम्या खोट्या असून बॅनर त्याच जागेवर असल्याचे विश्वनाथ कोरडे यांनी दावा केला.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.