साताऱ्यात भाजप, राष्ट्रवादीत वर्चस्वाची लढाई; तर शिवसेनेच्या दोन्ही गटात सामना रंगणार

Gram Panchayat Election : सातारा जिल्ह्यात ३१९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे
Gram Panchayat Election
Gram Panchayat ElectionSarkarnama

Gram Panchayat Election : सातारा जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून यावेळेस स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या गटातच लढती होणार आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीत वर्चस्व राखण्यासाठी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या नेत्यांनीही लक्ष घातल्यामुळे या दोन पक्षातच सत्ता संघर्ष रंगणार आहे.

जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Gram Panchayat Election) होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सरपंच पदाच्या ३१९ जागांसाठी एक हजार ४४१ तर सदस्य पदाच्या दोन हजार ६६१ जागांसाठी तब्बल सहा हजार ९५७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असूनही मागील काही निवडणुकीत राष्ट्रवादीची पडझड झाली. तर दुसरीकडे जिल्ह्यात भाजपची ताकत वाढली आहे.

Gram Panchayat Election
बेळगावात येऊ नका ; मुख्यमंत्री बोम्मईंचा महाराष्ट्रातील मंत्र्यांना इशारा

त्यामुळे आता भाजपने सर्व निवडणुकांत लक्ष घालण्याची तयारी केली आहे. गावपातळीवर राष्ट्रवादीची ताकत असली तरी नेत्यांसोबत कार्यकर्तेही भाजपचे कार्यकर्ते झाल्याने यावेळेस सर्वच निवडणुकांत राष्ट्रवादी (NCP) विरुद्ध भाजप (BJP) असा सत्ता संघर्ष पहायला मिळणार आहे. त्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी प्रत्येक मतदारसंघात भाजपची ताकत वाढविण्यासाठी मायक्रो प्लनिंग केले आहे.

त्यासाठी भाजपचे दोन आमदार, दोन खासदार यांच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहेत. मात्र, भाजपला आगामी निवडणुकांत अडविण्यासाठी राष्ट्रवादी कडून प्रयत्न होणार आहेत. त्यासाठी त्यांना उद्धव ठाकरे शिवसेना व काँग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे. तसेच राष्ट्रवादीचा पण भाजपमध्ये सहभागी झालेल्या गटाचीही मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे इतक्या मोठ्याप्रमाणात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक पातळीवर आमदार, खासदारांच्या गटाच्या माध्यमातून पॅनेल टाकली जाणार आहेत.

पाटण, कोरेगाव, महाबळेश्वरमध्ये बाळासाहेबांची शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पहायला मिळणार आहे. तर सातारा, जावली, वाई, कराड, खंडाळा, फलटण, माण, खटावमध्ये राष्ट्रवादी व भाजपच्या गटातच लढती होतील. त्यामुळे राष्ट्रवादी सोबतच भाजप, शिंगे गट, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि काँग्रेसचे स्थानिक पातळीवरील नेते या संघर्षात भिडणार आहेत.

भाजपशी दोन हात करताना राष्ट्रवादीला प्रत्येक तालुक्यात महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. तर भाजपसोबत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, रयत क्रांती संघटना, रासप आदी सहभागी होणार आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी व भाजपमध्येच संघर्ष होणार आहे. परिणामी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचा पाया भक्कम करण्याची तयारी या दोन पक्षांकडून होणार आहे.

Gram Panchayat Election
Sanjay Raut : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर राऊतांचा पलटवार ; म्हणाले, "तुम्ही जर सोलापुरात.."

तालुकानिहाय ३१९ सरपंच व दोन हजार ६६१ सदस्य पदासाठी दाखल अर्ज :

सातारा : सरपंच १४०, सदस्य ८५०, कराड सरपंच १८९, सदस्य १०१९, पाटण : सरपंच ३६०, सदस्य १६७८, कोरेगाव : सरपंच २०७, सदस्य १०१२, वाई : सरपंच ३५, सदस्य १९७, खंडाळा : सरपंच २०, सदस्य १३४, महाबळेश्वर : सरपंच १३, सदस्य ६०, जावली : सरपंच ४६, सदस्य १९०, फलटण : सरपंच १६९, सदस्य ७३६, माण : सरपंच १८३ सदस्य ७७६, खटाव : सरपंच ७९, सदस्य ३०५.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com