Phaltan NCP News : परिवर्तनाची सुरवात फलटणमधुन होणार : शशिकांत शिंदेंचा इशारा नेमका कोणाला

Shashikant Shinde राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या स्वागतासाठी फलटण येथे आलेले आमदार शशीकांत शिंदे पत्रकारांशी संवाद साधला.
Shashikant Shinde, Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik Nimbalkar
Shashikant Shinde, Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik NimbalkarSarkarnama

-किरण बोळे

Phaltan NCP News : राज्यात भाजपने फोडाफोडीचे राजकारण सुरु केले आहे. त्याबद्दल सर्वसामान्य जनतेत प्रचंड चीड आहे. पक्षातील नेते गेले असले तरी सर्वसामान्य जनता मात्र, शरद पवार साहेबांसोबत उत्स्फुर्तपणे असल्याचे चित्र आहे. त्यांचे सातारा जिल्हा व फलटणवर विशेष प्रेम आहे, त्यामुळे आगामी काळात परिवर्तनाची सुरुवात फलटणमधुन होईल, असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार Sharad Pawar यांच्या स्वागतासाठी फलटण येथे आलेले आमदार शशीकांत शिंदे Shashikant Shinde पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना हे पक्ष देशामध्ये व राज्यात एक चांगला पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

शिंदे म्हणाले, येणारा काळ परीक्षेचा आहे. २०२४ च्या निवडणुकांत जर भाजप पुन्हा सत्तेत आले तर देशात लोकशाही जिवंत राहिल की नाही हा प्रश्न आहे. त्यामुळे परिवर्तनाची सुरुवात ही महाराष्ट्रातुन व फलटणमधून व्हावी ही आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

फलटण येथील गट अजित पवार यांच्यासोबत गेल्याबद्दल त्यांना छेडले असता ते म्हणाले, प्रत्येकास निर्णय घेण्याचा आधिकार लोकशाहीमध्ये आहे. आगामी काळात लोकसभेला फलटणला संधी द्यावी अशी मागणी प्रदेशाध्यक्षांसह आम्ही सर्वांनी पक्ष नेतृत्वाकडे केली होती. ती देण्याबाबत निर्णयही झाला होता परंतू पक्षामध्ये फुट पडली.

Shashikant Shinde, Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik Nimbalkar
Maan NCP News : मोदींनी तुमच्या प्रश्नांकडे किती लक्ष दिले : शरद पवारांचा माणच्या जनतेला सवाल

भविष्य काळात अजुन अनेक घडामोडी होणार आहेत. आज फलटण येथे साहेबांच्या स्वागतासाठी स्वयंस्फुर्तीने जमलेले दुसरी, तिसरी फळीतील प्रमुख आहेत, ती एक वात आहे ती पेटल्या शिवाय राहणार नाही. फलटणमध्ये नक्की बदल होईल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

पावसाळ्यानंतर महाविकास आघाडीत समाविष्ट असलेले तिनही पक्ष मिळून राज्य पिंजून काढणार आहेत. त्यावेळी राज्यभरात मोठा उठाव झालेला पहावयास मिळेल. आजमितीस सर्वसामान्य जनता, शेतकरी, तरुण पिढी यांच्यामध्ये सरकारविषयी तिव्र नाराजी आहे त्यामुळे येणारा काळामध्ये क्रांती पहायला मिळेल, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

Edited By Umesh Bambare

Shashikant Shinde, Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik Nimbalkar
BJP for Sharad Pawar : भाजप नेते शरद पवारांबाबत `सॉफ्ट`; निवडणुकीसह 'हे' आहे खास कारण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in