मढीत राजकीय रंगपंचमी : देवस्थानच्या आजी-माजी विश्वस्तांत आरोप-प्रत्यारोप

रंगपंचमी अवघ्या दोन दिवसांवर आली असताना मढी देवस्थानमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राजकीय रंगपंचमी सुरू झाली आहे.
Madhi
Madhi Sarkarnama

अहमदनगर - राज्यभरात मढीची रंगपंचमी प्रसिद्ध आहे. त्या दिवशी मढीची यात्रा असते. रंगपंचमी अवघ्या दोन दिवसांवर आली असताना मढी देवस्थानमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राजकीय रंगपंचमी सुरू झाली आहे. ( Political Rangpanchami in Madhi: Allegations against the existing and former trustees of the temple )

मढी ( ता. पाथर्डी, जि. अहमदनगर ) या ठिकाणी नवनाथांपैकी एक असलेल्या कानिफनाथांची समाधी आहे. या ठिकाणाला भटक्यांची पंढरी असेही म्हंटले जाते. यंदा कानिफनाथांचा जन्मदिवस साजरा करण्याच्या नादात काही जणांनी कानिफनाथांच्या समाधी जवळ केक ठेवून वाढदिवस साजरा केला. ही घटना 12 ऑगस्ट 2021ला घडली होती. यावरून मढी देवस्थानचे विश्वस्त व विरोधकांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या आरोपांनी आता भ्रष्टाचाराच्या आरोपांपर्यंत मजल गाठली आहे. त्यामुळे यंदाची मढीतील रंगपंचमी रंगांबरोबर राजकीय आरोप-प्रत्यारोपांचीही होऊ लागली आहे.

Madhi
Rajale vs Dhakne: पाथर्डी नगरपालिका निवडणुकीसाठी राजळे-ढाकणेंची मोर्चे बांधणी सुरू

माजी विश्वस्त सुनील सानप व डॉ. रमाकांत मरकड यांनी अहमदनगर येथे तीन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन कानिफनाथांच्या वाढदिवसाबाबत गौप्यस्फोट केला होता. डॉ. रमाकांत मरकड म्हणाले की, मढी येथील कान्होबा ऊर्फ कानिफनाथ देवस्थान येथील विद्यमान विश्वस्तांनी 2020ला पदभार स्वीकारला. कोरोना काळात पदभार स्वीकारूनही कोट्यावधीचा खर्च त्यांनी दाखविला आहे. अऩ्न छत्रालय बंद असताना बिले सादर केली आहेत. हा सर्व खर्च विना ठराव केला आहे. 11 विश्वस्त असताना अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष यांनी मनमानी पद्धतीने खर्च चालविला आहे. या संदर्भात आम्ही अहमदनगरमधील धर्मादाय आयुक्त कार्यालय व पुणे-मुंबईतही तक्रारी केल्या आहेत. राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांनाही निवेदन दिले. तरीही अधिकारी कारवाई करत नाहीत. अडीच ते तीन कोटीचा हा भ्रष्टाचार आहे. ग्रामपंचायतीचा खर्च दाखवून हा भ्रष्टाचार करण्यात आला. राजकीय अड्डा बनवायचा म्हणून देवस्थानच्या अध्यक्षांनी मंगल कार्यालय घेतले, असल्याचा आरोप मरकड यांनी केला.

सुनील सानप यांनी सांगितले की, मी या देवस्थानमध्ये पाच वर्षे उपाध्यक्ष होतो. या देवस्थानचे भ्रष्टाचाराचे पुरावे महाराष्ट्र राज्य धर्मादाय आयुक्तांसमोर मांडले. नवनाथांचा पुराणात जन्मतारखेचा उल्लेख नाही. असे असताना आता आलेल्या कानिफनाथ देवस्थानच्या अध्यक्षांनी समाधी जवळ समाधी एवढ्या आकाराचा केक 12 ऑगस्ट 2021 ला कापून संत, महंत, हिंदू संस्कृती, हिंदू धर्म याला ठेच पोहोचविली आहे. या अध्यक्षांना हिंदू देवस्थानांचा अध्यक्ष न करता एखाद्या चर्चचा अध्यक्ष करा. मला विश्वस्त व्हायची इच्छा नाही.

Madhi
असा झाला सदाशिव लोखंडेंचा चेंबूर ते शिर्डी राजकीय प्रवास

सुनील सानप व डॉ. रमाकांत मरकड यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड व विश्वस्तांनी पाथर्डी येथे पत्रकार परिषद घेतली. यात संजय मरकड यांनी सांगितले की, मुंबई येथील धर्मादाय आयुक्तांकडे कानिफनाथ देवस्थान संदर्भात सुनील सानप यांनी जे आरोप केले होते. ते सर्व आरोप संपूर्ण निराधार आहेत. पुराव्या निशी आमच्याकडे या आरोपांची उत्तरे आहेत. त्यांना ज्यावेळी वेळ असे त्यावेळी बैठक लावून त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत. मढी गडावर एक रुपयांचाही भ्रष्टाचार होत नाही. न खाऊंगा न खाने दुंगा. मढी गावात भाविकांना सुविधा देण्यासाठी जे काही करता येईल ते मी करत आहे. या आरोपांची सीबीआय चौकशी लावा. आमच्या 16 महिन्यांच्या कार्यकाळाची चौकशी करा त्यांच्या कार्यकाळाची चौकशी करू नका. अऩ्यथा त्यांना जेलमध्ये जावे लागेल. या चौकशीत भ्रष्टाचार आढळला तर देईल ती शिक्षा भोगण्यासाठी आम्ही तयार आहोत. कोविड काळात देवस्थान तर्फे दोन कोविड सेंटर चालविले. त्यासाठी 2 लाख 92 हजार 370 रुपये खर्च आला, असे संजय मरकड यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com