बिबट्या सफारीचा चेंडू आता मुनगंटीवारांच्या कोर्टात; जागेवरून होणार राजकीय संघर्ष!

Junnar News : अजित पवार यांनी जुन्नर बिबट्या सफारी बारामतीला पळवल्याचा आरोप सोनवणे यांनी केला होता.
Junnar Leopard safari Latest News
Junnar Leopard safari Latest NewsSarkarnama

पुणे : मानव बिबट्या संघर्षाची सर्वात मोठी समस्या असलेल्या जुन्नर (Junnar) तालुक्यातील प्रस्तावित असलेल्या बिबट्या सफारीच्या जागेबाबत राजकीय संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जुन्नरची प्रस्तावित सफारी बारामतीला पळविल्याच्या आरोप-प्रत्यारोपांनंतर जुन्नरच्या सफारीच्या डिपीआरसाठी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंजुर केलेल्या दिड कोटींच्या निधीतुन दोन जागांचे पाहणी अहवाल वन विभागाला सादर केले आहेत. यामध्ये कुरण-खानापूर आणि आंबेव्हाणच्या जागांचा समावेश असून, यामध्ये कुरण-खानापूरला झुकते माप दिल्याने माजी आमदार शरद सोनवणे (Sharad Sonavane) यांनी राजकीय आकसापोटी जागा बदलणे चुकीचे असून, हा प्रकल्प आंबेगव्हाण येथेच व्हावा,अशी भूमिका घेत मुख्यमंत्री व वन मंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे सांगितले. तर महायुतीच्या काळातील वनमंत्री सुधीर मुनगंटीवर (Sudhir Mungantiwar) यांनी आंबेगव्हाणला तत्वतः मंजुरी दिल्याने आणि आता तेच वनमंत्री असल्याने आंबेगव्हाणच्या जागेवरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. (Junnar Leopard safari Latest News)

Junnar Leopard safari Latest News
'अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांनी सही केली'

जुन्नर (जि.पुणे) तालुक्यातील बिबट्या समस्या कमी होण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी तत्कालीन आमदार शरद सोनवणे यांच्या पुढाकाराने २०१८ मध्ये आंबेगव्हाण येथे बिबट्या सफारी प्रस्तावित केली होती. त्यावेळी शिवसेना- भाजपाच्या महायुती सरकार मधील तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील या जागेला तत्वतः मंजुरी दिली होती. मात्र सत्तांतरानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमधील वजनदार मंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात बारामती बिबट्या सफारीसाठी ६० कोटींची तरतुत केल्याने, जुन्नर बिबट्या सफारी बारामतीला पळवल्याचा आरोप सोनवणे यांनी पवार यांच्यावर केला होता. यानंतर सोनवणे यांनी उपोषण करून, तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातुन जुन्नर बिबट्या सफारीच्या सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये दिड कोटींचा निधी मंजुर करून घेतला.

Junnar Leopard safari Latest News
भाजपाने नेमला मुख्यमंत्री कार्यालयात आपला खास माणूस !

दरम्यान, या निधीतुन जुन्नर वन विभागाने विविध जांगाचे सर्वेक्षण करून, प्रकल्प अहवालासाठी दोन संस्थांची नियुक्ती केली. या संस्थांनी आंबेगव्हाण आणि कुरण या गावांच्या लगतच्या वनक्षेत्रची पाहणी करून, अहवाल सादर केला. या दोन्ही जागांच्या अहवालांतुन कुरण येथील जागेला झुकते माप दिले आहे. यामुळे सोनवणे यांनी यावर नाराजी व्यक्त करून, ‘‘जुन्नर तालुक्यातील बिबट सफारीची जागा राजकीय आकसापोटी बदलणे चुकीचे असून, हा प्रकल्प आंबेगव्हाण येथेच व्हावा, अशी माझी ठाम भूमिका आहे. कुरण-खानापूर येथे मानवी वस्तीजवळ हा प्रकल्प मंजूर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे,’’ असे म्हटले आहे. सोनवणे यांच्या भुमिकेमुळे सफारी आता कुठे होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

वनमंत्री मुनगंटीवर घेणार अंतिम निर्णय

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महायुतीच्या काळात आंबेगव्हाण जागेला तत्वतः मंजुरी दिली होती. या जागेसाठी स्वतः वनमंत्री आग्रही असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापनेच्या अगोदरचा अहवाल असल्याने वनमंत्री हा अहवाल फेटाळुन आंबेगव्हाण येथेच बिबट्या सफारीसाठी आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे आता वनमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

अशी आहे कुरण खानापूरची जागा

कुरण आणि खानापूरची एकुण जागा ४७.१४ हेक्टर जागा सौम्य उताराची, झाडोरा असलेली सपाट जागा आहे. जागा सपाट असल्याने संरक्षक भिंत बांधणे, पिंजरे आणि पायाभुत सुविधा उभारणे सोईस्कर आहे. तसेच हि जागा माणिकडोह निवारा केंद्रापासून,१३ किमी अंतरावर असल्याने बिबट्यांच्या वाहतुक उपचारासाठी सोईस्कर आहे. तर ठिकाणापासुन शिवनेरी लेण्याद्री जवळ असल्याने पर्यटकांसाठी सोईस्कर राहिल, असे अहवालात म्हटले आहे.

अशी आहे आंबेगव्हाणची जागा

आंबेगव्हाणची जागा ४६ हेक्टर एवढी असून, या क्षेत्रात ३ नाले वाहत आहेत. ही जागा नगर जिल्‍ह्याला लागुन असल्याने, या ठिकाणी अकोले तालुक्यातुन पुर्वीपासून रस्ता असल्याने या ठिकाणी नव्या रस्त्यांची गरज नाही. या भागातील नैसर्गिक नाल्यांवर मृद आणि जलसंधारणाची कामे करून, नैर्सगिकरित्या पाणीसाठी होऊ शकतो. तो बिबट्यांच्या अधिवासासाठी उत्तम ठरू शकतो. या भाग बफर झोन जाहीर करून, या ठिकाणी गिर्यारोहण, निसर्ग वाटा, पक्षी निरिक्षण नैर्सगिक धबधबे, संग्रहालय. माहिती केंद्र उभारू शकतो. मात्र यासाठी मोठ्याप्रमाणावर खर्च अपेक्षित आहे. तसेच मोठे नाले आणि सदरचे क्षेत्र बंदिस्त करणे अडचणीचे आहे, असे अहवालात म्हटले आहे.

बिबट्याला हवा एकांतवासाची जागा

दरम्यान बिबट्या सफारीच्या जागे बाबत तत्कालीन उपनसंरक्षक आणि चंद्रपुर वन अकादमीचे माजी संचालक अशोककुमार खडसे म्हणाले की,‘‘बिबट्या आणि वन्यजीवांना नैसर्गिक एकांतवास हवा असतो. कुरण आणि खानापूरच्या परिसरात दोन शैक्षणिक संस्थांची संकुले असून, या परिसरात रहदारी आणि वाहतुक मोठी आहे. भविष्यात या परिसरातील नागरिकरण वाढणार आहे. परिणामी वाहतुक रहदारीच्या गोंगाटामुळे बिबट्यांमध्ये चिडचिडेपणा येणार आहे. यामुळे सफारी कुरण-खानापूर या परिसरात करणे योग्य होणार नाही. यासाठी आंबेगव्हाण या चढउताराचा ओढे नाले असणारा आणि एकांतवासाचा प्रदेश बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासासाठी योग्य आहे. हा परिसर नगर जिल्ह्याच्या सिमेवर असल्याने नगर जिल्ह्याला देखील फायदेशीर ठरणार आहे. याचा विचार शासनाने करावा, असे त्यांनी म्हटले आहे.

सफारीचा असा आहे प्रवास...

  • २००३ मध्ये तत्कालीन उपवनसंरक्षक अशोककुमार खडसे यांचा जुन्नर नगरपालिकेच्या कुंभार तलाव परिसरात सफारीचा प्रस्ताव. राजकीय अनास्थेमुळे प्रकल्प रेंगाळला

  • २००४ मध्ये तत्कालीन -वनमंत्री बबनराव पाचपुते यांचा बेलवंडी (जि.नगर) येथे आग्रह, यासाठी दक्षिण आफ्रिकेचा विशेष दौरा. मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे प्रकल्प झाला नाही.

  • वनमंत्री दिवंगत पतंगराव कदम यांचा सह्याद्री टायगर रिझर्व्ह आणि पशुचिकित्सालयाची प्रस्ताव, टायगर रिझर्व्हला परवानगी, काम सुरु

  • २०१६ पासून जुन्नर वनविभागात सफारी प्रस्तावित, यासाठी आंबेगव्हाण आणि चाकणचा सर्व्हे, आंबेगव्हाणला तत्वतः मान्यता. मात्र डिपीआर अभावी बारगळला.

  • - २०२२ - पुणे वन विभागातील गाडीखेल (ता.बारामती) येथील सफारीसाठी अर्थसंकल्पात ६० कोटींची तरतूद

  • १ मे २०२२ - जुन्नर बिबट्या सफारीच्या सर्वेक्षण आणि डिपीआरसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडुन दिड कोटींचा निधी मंजुर

  • १७ जून २०२२ - कुरण आणि आंबेगव्हाणच्या जागेच्या सर्वेक्षण अहवाल सादर, कुरणच्या जागेला झुकते माप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in