शिर्डीतील कथित दहशतवादी हल्ल्याच्या बातमीवर पोलिस म्हणाले..

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी देवस्थान हे जगभरात प्रसिद्ध आहे.
shirdi sanshtan
shirdi sanshtanSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी देवस्थान हे जगभरात प्रसिद्ध आहे. साईबाबांच्या शिर्डीवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाली. यावर अहमदनगर जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात अहमदनगर जिल्ह्याचे अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन या बातमीचे खंडण केले आहे. तसेच शिर्डीसह अहमदनगर जिल्हा सुरक्षित असल्याचे सांगितले. ( Police said on the news of alleged terrorist attack in Shirdi .. )

काही प्रसारमाध्यमांमध्ये आज श्री. साईबाबांच्या शिर्डीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली. यात दुबईवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली दिल्याने खळबळ माजलीय अशा स्वरुपाची माहिती बातमीतून देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे व भयाचे वातावरण पसरले होते.

shirdi sanshtan
नगर जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

सौरभकुमार अग्रवाल म्हणाले की, अहमदनगर जिल्हा पोलिस दलाचे या बातमीची गांभिर्याने दखल घेवुन सर्व संबंधीत तपास यंत्रणाशी संपर्क करुन प्रसिध्दीस दिलेल्या बातमीची खात्री केली असता अशा प्रकारची घटना अहमदनगर जिल्ह्यात कोठेही घडली नसल्याचे सांगण्यात आले. साईबाबांच्या शिर्डीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्दीस दिलेल्या बातम्या या निरर्थक व निराधार आहेत, असे अग्रवाल यांनी सांगितले.

shirdi sanshtan
शिर्डी विमानतळ प्रश्नावर सुजय विखेंच्या प्रयत्नाला यश

शिर्डीतील श्री. साईबाबा मंदिर हे आंतरराष्ट्रीय देवस्थान असुन दर्शनास येणाऱ्या भाविकांनी व स्थानिकांनी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आवाहन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in