पोलिस उपमहानिरीक्षकांनी घेतली अण्णा हजारेंची भेट : उपोषणावर ठाम

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनी सोमवारपासून ( ता. 14 ) उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे.
Anna Hazare
Anna HazareSarkarnama

पारनेर ( जि. अहमदनगर ) - राज्य सरकारने सुपर मार्केट व किराणा दुकानांत वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनी सोमवारपासून ( ता. 14 ) उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी उपोषण करू नये म्हणून त्यांची मनधरणी करण्यासाठी कालपासून प्रशासकीय अधिकारी राळेगणसिद्धीत येत आहेत. मात्र अण्णा हजारे अजूनही उपोषणावर ठाम आहेत. ( Police inspectors visit Anna Hazare: Insist on fast unto death )

अण्णा हजारे यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी हजारे यांची आज (ता. 12 ) दुपारी एक वाजेच्या सुमारास भेट घेऊन उपोषण करू नये अशी विनंती केली. या उभयतांमध्ये बंद दाराआड सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ चर्चा झाली. मात्र हजारे यांनी मी आपल्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.

Anna Hazare
Video : अण्णा हजारे आक्रमक; 14 तारखेपासून आमरण उपोषण

राज्य सरकारने वाईनची विक्री सुपर मार्केट तसेच किराणा दुकानातून करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात हजारे सोमवारपासून उपोषण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शेखर व हजारे यांच्यात यादवबाबा मंदिरात हजारे यांच्या खोलीत बंद दाराआड दीर्घ चर्चा झाली. या वेळी शेखर यांनी हजारे यांना उपोषण करू नये अशी विनंती केली. तसेच वाढत्या आपल्या वयाचा विचार करता उपोषण आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक आहे. त्यामुळे हा प्रश्न चर्चा करून सोडवावा अशी विनंती केली. मात्र चर्चेनंतर हजारे यांनी मी माझ्या मागणीवर ठाम आहे. राज्य सरकारने वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. त्यांनी तो मागे घ्यावा. मी माझ्या मागणीवर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हजारे यांचे उपोषण जवळजवळ निश्चितच झाल्याचे दिसून येत आहे.

Anna Hazare
अण्णा हजारे यांनी अमित शहांना पत्र काय लिहिले आणि दोन मित्रांतच वाद पेटला...

या भेटीच्या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, उत्पादन शुल्क पुणे विभागाचे प्रसाद सुर्वे, पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, सरपंच लाभेष औटी, माजी सरपंच जयसिंग मापारी, सुरेश पठारे, दत्ता आवारी, श्याम पठाडे, भालचंद्र दिवटे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com