कर्जतमध्ये पोलिसच निघाला वाळू तस्कर

एक पोलिस ( Police ) कर्मचाऱ्याचीच वाहने अवैध वाळू तस्करी करताना महसूल प्रशासनाला आढळून आली आहेत.
कर्जतमध्ये पोलिसच निघाला वाळू तस्कर
वाळू तस्कर वाहन संग्रहित छायाचित्रसरकारनामा

कर्जत : अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याचा अधिकार महसूल व गौणखनिज विभागाला आहे. बऱ्याच वेळा पोलिसही अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करताना दिसतात. मात्र कर्जतमध्ये वेगळाच प्रकार समोर आला आहे. एक पोलिस कर्मचाऱ्याचीच वाहने अवैध वाळू तस्करी करताना महसूल प्रशासनाला आढळून आली आहेत. त्यामुळे हे प्रकरण जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरत आहे. Police are sand smugglers in Karjat

कर्जत-जामखेडचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना अवैध वाळूवाहतूक करणारा ट्रक आढळून आला. त्यांनी तो ट्रक अडविला. ट्रक चालकाने प्रांताधिकाऱ्यांना शिवीगाळ करून ट्रक पळवून नेल्याप्रकरणी पोलिस कर्मचारी केशव व्हरकटे व अज्ञात वाहनचालकाविरुद्ध कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

वाळू तस्कर वाहन संग्रहित छायाचित्र
कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे झाले पुन्हा सक्रिय

या संदर्भात तलाठी दीपक बिरुटे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे, की काल (शुक्रवार) सकाळी साडेसातच्या सुमारास प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांनी फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी तहसीलदार नानासाहेब आगळे, तसेच कर्जत मंडळ अधिकारी बाळासाहेब सुद्रिक व तलाठ्यास बोलावून घेतले. कर्जत शहरात अवैध वाळूवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलो असता, एका ट्रक (एमएच 12 आरएन 4704) अंदाजे तीन ब्रास वाळू वाहतूक करताना आढळून आला. डॉ. थोरबोले यांनी ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चालक वाहनासह पळून गेला.

वाळू तस्कर वाहन संग्रहित छायाचित्र
कर्जत-जामखेडच्या रस्त्यांसाठी रोहित पवारांचे थेट गडकरींना साकडे

याप्रकरणी कर्जत पोलिसांनी केशव व्हरकटे व अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. केशव व्हरकटे हा पोलिस कर्मचारी आहे. त्यामुळे अवैध गोष्टींना विरोध करण्यासाठी असलेले पोलिसच अवैध वाळुवाहतूक करत असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. केशव व्हरकटे पसर आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in