वादग्रस्त अधिकाऱ्यांना आयुक्तांचा दणका ; महत्वाचे पदभार काढले

पिंपरी महापालिका प्रशासनात अनेक अधिकारी तथा विभागप्रमुखांकडे एकापेक्षा अधिक कार्यभार आहेत.त्यामुळे काहींचे ते कमी करण्यात आले.त्यामुळे काहींचे ते वाढले गेले आहेत.
rajesh patil pcmc
rajesh patil pcmcsarkarnama

पिंपरी : सत्ताधारीच नाही,तर विरोधकांच्याही दबावाला बळी न पडता नियमानुसार काम करणारे परखड अधिकारी म्हणून अल्पावधीतच चर्चेत आलेले पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांच्या पिंपरीतील टर्मला पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे.

दरम्यान,या काळात त्यांना आपल्या अधिकाऱ्यांच्या नेमका अंदाज आला आहे. त्यातून त्यांनी उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजात बुधवारी (ता.१२) फेरबदल केला.त्यानुसार वादग्रस्त अधिकाऱ्यांकडील महत्वाचे पदभार काढून त्यांच्याकडे कमी महत्वाचे विभाग सोपवित त्यांना दणका दिला.तर, कार्यक्षम अधिकाऱ्यांकडे आणखी महत्वाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली.

पिंपरी महापालिका प्रशासनात अनेक अधिकारी तथा विभागप्रमुखांकडे एकापेक्षा अधिक कार्यभार आहेत.त्यामुळे काहींचे ते कमी करण्यात आले.त्यामुळे काहींचे ते वाढले गेले आहेत. करसंकलन विभागातील दोन लिपिक लाचखोरीत गेल्या महिन्यात पकडले गेले. त्यानंतर या विभागाच्या प्रमुख उपायुक्त स्मिता झगडे यांच्या बदलीची मागणी झाली होती. तशाही त्या आल्यापासून त्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरलेली आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीवरील आक्षेपांमुळे सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीच त्यांना पुन्हा राज्य शासकीय सेवेत पाठविण्याची मागणीही केली होती.

कालच्या खांदेपालटात त्यांच्याकडील महत्वाच्या व पालिकेचा आर्थिक कणा असलेल्या करसंकलन विभागाचे प्रमुखपद काढून घेण्यात आले. तर, पशुवैद्यकीय आणि एलबीटी तथा स्थानिक संस्था कर विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. करसंकलन विभागाचे प्रमुख आता निलेश देशमुख यांना करण्यात आले आहे.त्यांच्याकडील पशुवैद्यकीय विभाग झगडेंकडे देण्यात आला आहे. तर, आकाशचिन्ह हा पालिकेला महसूल मिळवून देणारा दुसरा विभाग,मात्र त्यांच्याकडेच ठेवण्यात आला आहे.

rajesh patil pcmc
नारायण राणे आज घेणार महत्वाचा निर्णय ; अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात

सहाय्यक आयुक्त (निवडणूक आणि दक्षता) बाळासाहेब खांडेकर यांच्याकडे प्रशासन या महत्वाच्या विभागाचीही आता जबाबदारी देण्यात आली आहे. जनता संपर्कचे सहाय्यक आय़ुक्त म्हणून प्रशासनचे वामन नेमाणे हे आता काम पाहणार आहेत. त्यामुळे प्रशासनाचे काम पाहणारे सहाय्यक आय़ुक्त राजेश आगळे यांना आता फक्त ई प्रभाग क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम करावे लागणार आहे. तर, उपायुक्त सुभाष इंगळे यांच्याकडील प्रशासनाचा कार्यभार काढून घेऊन त्यांच्याकडे फक्त उद्यान विभाग ठेवण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in