Vaibhav Pichad Vs Dr. Kiran Lahamte

Vaibhav Pichad Vs Dr. Kiran Lahamte

Sarkarnama

अकोलेमध्ये पिचड, लहामटेंचे शक्तिप्रदर्शन

भाजपचे ( BJP ) नेते माजी आमदार वैभव पिचड व राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) नेते डॉ. किरण लहामटे ( Dr. Kiran Lahamte ) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

अकोले ( जि. अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले नगर पंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत भाजपचे ( BJP ) नेते माजी आमदार वैभव पिचड व राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) नेते डॉ. किरण लहामटे ( Dr. Kiran Lahamte ) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. Pichad, Lahamate's show of strength in Akole

अकोले नगरपंचायत निवडणुकीत या पूर्वी 13 प्रभागांसाठी मतदान झाले आहे. उर्वरित 4 प्रभागातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यानुसार आज वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली भाजप उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही आमदार किरण लहमटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चार प्रभागात उमेदवारी अर्ज भरले. प्रथम भाजप कार्यालयातून मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज भरण्यात आले त्यानंतर अर्धा तासानंतर राष्ट्रवादी पक्षाने मिरवणूक काढून घोषणा देत अर्ज भरले.

<div class="paragraphs"><p>Vaibhav Pichad Vs Dr. Kiran Lahamte</p></div>
डॉ. किरण लहामटे म्हणाले, सत्ता द्या विकास पहा...

अकोले नगरपंचायतच्या 17 प्रभागापैकी 13 प्रभागाची निवडणूक झाल्यानंतर राहिलेल्या प्रभाग क्रमांक 4, 11, 13 व 14 अशा 4 प्रभागांसाठी 18 जानेवारीला मतदान होईल. या वेळी पिचड व लहामटे दोघांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com