Phaltan : गडकरींच्या कार्यक्रमाला रामराजेंची उपस्थिती; अनेकांच्या भुवया उंचावल्या

Nitin Gadkari केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून फलटण शहर, तालुका व माढा मतदारसंघात विविध विकास कामे व रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला आहे.
Phaltan Programme
Phaltan Programmesarkarnama

Phaltan News : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar यांनी आज केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांच्या भव्य नागरी सत्काराचे फलटणमध्ये आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar व आमदार दीपक चव्हाण व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून फलटण शहर, तालुका व माढा मतदारसंघात विविध विकास कामे व रस्त्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंत्री गडकरी यांचा आज फलटणला भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार का, याची उत्सुकता फलटण तालुक्यात होती. कार्यक्रमाच्या स्थळी ही उपस्थितांत चर्चेला ऊत आला होता. दरम्यान, हेलिकॉप्टरने मंत्री नितीन गडकरी यांचे फलटणला आगमन झाले. यावेळी त्यांचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे सातारचे खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते.

Phaltan Programme
Satara : मेडिकल कॉलेजच्या भंगार चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

त्यानंतर सभेच्या ठिकाणी ही मंडळी येण्यास निघाली. त्यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर व फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांचे आगमन झाले होते. कार्यक्रमास भाजपसह राजे गटाचे कार्यकर्तेही मोठ्यासंख्येने उपस्थित राहिले आहेत. त्यामुळे गेली दोन दिवस सुरु असलेल्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला.

Phaltan Programme
Nitin Gadkari News : गडकरींनी धमकी देणाऱ्या गुंडाची ती डायरी पोलिसांच्या हाती ; आणखी काही जणांना धमकीचे फोन..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com