इंग्रजांपेक्षाही अमानुष प्रकार देशात; जनतेला न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागणार...

महाविकास आघाडी सरकारने 'महाराष्ट्रात बंद' पाळण्याचा निर्णय घेतला. सातारा जिल्ह्यातील जनतेने मनापासुन या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.
इंग्रजांपेक्षाही अमानुष प्रकार देशात; जनतेला न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागणार...
Balasaheb Patilsarkarnama

कऱ्हाड : लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र सरकारने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील जनतेने मनापासुन या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. दरम्यान, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलीदान पत्करले. तो लढा इंग्रज, परदेशीयांविरोधात होता. मात्र, देशातील जनतेला स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढा देत असतानाही इंग्रजापेक्षा अमानुष प्रकार केंद्र सरकारकडून वाढले आहेत, असाही आरोप मंत्री पाटील यांनी केला.

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री श्री. पाटील बोलत होते. ते म्हणाले, कृषी कायद्याच्या विरोधात वर्षभर उत्तर भारतात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्र शासनाने हे आंदोलन दडपण्याचा सातत्याने प्रयत्न केला. काहींना अटक करण्याचा प्रयत्न केला. लखीमपुर येथील आंदोलनातील शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलाने केला. दुर्दैवाने त्यात शेतकरी मृत्युमुखी पडले. पण त्यात संशयितांना तात्काळ अटकही झाली नाही. हे आंदोलन दडपण्याचा भयानक प्रयत्न त्यांनी केला.

Balasaheb Patil
मोदी हटाओ, देश बचाओ...घोषणाबाजीत करत 'महाविकास'चा साताऱ्यात मोर्चा...

देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलीदान पत्करले. तो लढा इंग्रज, परदेशीयांविरोधात लढा होता. मात्र देशातील जनतेला स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढा देत असतानाही इंग्रजापेक्षा अमानुष प्रकार केंद्र सरकारकडून वाढले आहेत. त्याच्या निषेधार्थ आज सोमवारी महाविकास आघाडी सरकारने 'महाराष्ट्रात बंद' पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

Balasaheb Patil
उद्धव ठाकरे म्हणाले, `राजकारण आपलं होतं, पण जीव जनतेचा जातो` 

सातारा जिल्ह्यातील जनतेने मनापासुन या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. व्यापाऱ्यांनीही सहकार्याची भुमिका घेतली आहे. देशातील शेतकरी जगला पाहिजे ही भुमिका बंद मागे आहे. लखीमपुरची ही अमानवी घटना घडली आहे त्याच्या निषेधार्थ हा बंद यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहे. आपण सायंकाळपर्यंत हा बंद पाळावा, अशी विनंती श्री. पाटील यांनी केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in