पाकिस्तानला कोरोनाची लस नेऊन देणारेच हिंदू-मुस्लीम वाद लावून देत आहेत...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी आक्रमक शैलीत केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

अहमदनगर - शिर्डी येथे काँग्रेसचे दोन दिवसीय नवसंकल्प शिबिराची आज सायंकाळी सांगता झाली. या शिबिराच्या समारोपाचे भाषण करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी आक्रमक शैलीत केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ( People who are vaccinating Pakistan with corona are causing Hindu-Muslim disputes ... )

नाना पटोले म्हणाले, मागील दोन दिवसांपासून शिर्डी येथे उदयपूर या नवसंकल्प घोषणेचे पालन करण्यासाठी आणि राज्याच्या दृष्टीने काय धोरणे राबविता येतील या दृष्टीने मंथन झाले. या मंथनातून देशात काँग्रेस प्रथम क्रमांकाचा पक्ष होईल. केंद्रात चुकीमुळे आलेल्या चुकीच्या सरकारने जाणीव पूर्वक देशाला बरबादित नेण्याचे, देशाला उद्वस्त करण्याचे, संविधानिक व्यवस्था संपविण्याचे, महागाईत लोटण्याचे, युवकांना बेरोजगार करण्याचे, शेतकऱ्यांना उद्वस्त करण्याचे, देशात गरिबी वाढविण्याचे काम केले. देशाच्या आता सीमाही सुरक्षित नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

Nana Patole
पुणतांबे येथील शेतकरी आंदोलकांना जाऊन नाना पटोले, बाळासाहेब थोरात भेटले : म्हणाले...

ते पुढे म्हणाले की, एका व्यक्तीकडे दोन पदे असलेल्या 51 पदाधिकाऱ्यांनी नेत्या सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार राजीनामे दिले आहेत. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या संदर्भातील 2015 मधील प्रकरण संपले होते. त्यात ईडीने नोटीस देऊन धमकाविण्याचे काम केंद्रातील असफल सरकार करत आहे. झुकेंगे नही, डरेंगे नही. ये काँग्रेसका कार्यकर्ता है ये झुकेंगा नही या पद्धतीचा संकल्प घेऊन जायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

मी व बाळासाहेब ठाकरे शेतकऱ्यांच्या पुणतांबे येथील आंदोलनात गेलो होते. शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न, शेतमालाच्या भावाचा प्रश्न हे मुद्दे दोन दिवसांत शिबिरात चर्चीले गेले आहेत. पुणतांब्यातील शेतकऱ्यांचे मुद्दे मी पाहिले. त्याच मुद्द्यावर मागील दोन दिवसांत आपण शिबिरात चर्चा केली. त्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांचे मी समर्थन केले. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे. त्यादृष्टीने राज्य सरकारने धोरण आणावे. केंद्र शेतकऱ्यांना समर्थन मूल्याच्या नावाखाली फसवत आहे. पुणतांब्यातील शेतकऱ्यांना भेटायला राज्यातील मंत्री गेले. मात्र दिल्लीत शेतकरी जेव्हा आंदोलन करत होते त्यावेळी केंद्रातील कोणताही मंत्री त्यांना भेटण्यासाठी गेला नाही. शेतकऱ्यांच्यातील काहींना बोलावून चर्चा करण्याचे नाटक त्यावेळी करण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला.

Nana Patole
नाना पटोले म्हणाले, संकटात असलेल्या हिमालयाला सह्याद्री वाचविण्यासाठी जाणार...

मोदींच्या निषेधाचा ठराव

केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्ध केले आहे. ते दिल्लीतील शेतकऱ्यांच्या जवळ गेले नाहीत. त्यांनी कधी शेतकऱ्यांशी चर्चा केली नाही. उलट शेतकऱ्यांना अतिरेकी ठरविण्याचा प्रयत्न झाला. तसे त्यांनी संसदेत सांगितले. या घटनेच्या निषेधाचा ठराव या शिबिरात करण्यात येत आहे, असे म्हणत निषेधाचा ठराव करून तो मंजूर करण्यात आला.

केंद्रातील भाजपचे सरकार निगरगट्ट

केंद्रातील भाजप सरकार विरोधात इंधनदरवाढ, बेरोजगारी, शेतकरी आंदोलने झाली तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. हे सरकार निगरगट्ट आहे. तुम्हाला स्वप्न दाखवून कसे मुर्खात काढले हे दाखवायला पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो असतो. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती 2013-14पेक्षा कमी आहेत. तरी पेट्रोल-डिझेलचे दर 100च्या पुढे आहेत. कोरोनात देश संकटात असताना पंतप्रधान मोदींनी पुण्यात तयार झालेली कोरोनाची लस पाकिस्तानला दिली. यातून त्यांना देशातील जनतेची किती काळजी आहे हे कळते, असे पटोले यांनी सांगितले.

समता-बंधूता सोडायची नाही

सोनिया गांधींच्या आदेशामुळे राज्यात महाविकास आघाडीला पहिल्याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी जनतेला द्यावी लागली. मी पक्षा पेक्षा मोठा आहे, असे अजिबात चालणार नाही. तुम्ही कशामुळे मंत्री झाले याची जाणिव ठेवली पाहिजे. संविधानातील समता-बंधूता सोडायची नाही. देशातील लोकांना वाचवायचे सोडून शत्रू राष्ट्राला कोरोनाची लस पोचवितात. तेच देशात हिंदू-मुस्लीम भांडणे लावू पाहत आहेत, असा आरोप पटोले यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com