Pichad Vs Lahamte : अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी विकासाचे ढोंग व झोपेचे सोंग - वैभव पिचड

भाजपचे माजी आमदार वैभव पिचड ( Vaibhav Pichad ) यांनी आंदोलनाचा इशारा दिला.
Vaibhav Pichad
Vaibhav PichadSarkarnama

Pichad Vs Lahamte : अकोले तालुक्यातील जनतेला गेली पाच महिन्यांपासून केंद्र, राज्य सरकारचे स्वस्थ धान्य मिळत नाही. शेतकरी अडचणीत आहेत, तर अकोले तालुक्याचे लोकप्रतिनिधी विकासाचे ढोंग व झोपेचे सोंग घेत आहेत. अधिकारी देखील झोपले आहेत का?, असा सवाल करत भाजपचे माजी आमदार वैभव पिचड ( Vaibhav Pichad ) यांनी आंदोलनाचा इशारा दिला.

आज सकाळी आदिवासी भागातील कुटुंबांनी माजी आमदार वैभव पिचड यांचेकडे जाऊन धान्य मिळत नसल्याची तक्रार केली त्याक्षणी माजी आमदार वैभव पिचड, नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, भाजप गट नेते जालिंदर वाकचौरे, गिरजाजी जाधव, राहुल देशमुख यांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन चौकशी केली त्यावेळी तहसीलदार अनुपस्थित होते.

Vaibhav Pichad
वैभव पिचड म्हणाले, कामापेक्षा वैयक्तिक टीका टिपण्णी हाच त्यांचा अजेंडा...

नायब तहसीलदार गणेश माळवे, रेशन अधिकारी भांगरे यांनी जिल्हा पुरवठा विभागाने धान्य पाठविले आहे. मात्र ठेकेदार हे धान्य उचलत नाही. त्यामुळे दुकानदारपर्यंत पोहचले नाही. प्रसंगी माजी आमदार वैभव पिचड यांनी आमदार व तहसीलदार याना दोषी ठरवत महविकास आघाडी काळात गरिबाचे रेशन काळया बाजारात जाते व ते ठेकेदार राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत.

आमदाराने मला गरीब माणसाने एक एक रुपया गोळा करून निधी आणून निवडून दिले असे सांगतात. मग ज्यांनी तुम्हाला निधी देऊन निवडून दिले नाही त्या लोकांना पाच महिन्यांपासून धान्य नाही मग तुम्ही झोपले आहेत का सोंग करता आज गरिबांची उपासमारी होत असून त्याला जबाबदार आमदार व तहसीलदार असेल .यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी आजच आम्ही मुख्यमंत्री यांचेकडे तक्रारकरणार आहोत. तसेच धान्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदार व त्यांना पाठबळ देणाऱ्या शक्तींची चौकशी करावी अशी मागणी करत आहोत.

Vaibhav Pichad
वैभव पिचड म्हणाले, आम्ही चाळीस वर्षे विकासच केला...

तालुक्याचे आमदार शासकीय दौरे नावाखाली स्वतचे खासगी दौरे काढून अधिकाऱ्यांना वेठीस धरत आहेत. शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झाले नाहीत. अधिकाऱ्यांनी राजकारण न करता आपण जनतेचे सेवक आहोत हे लक्षात घेऊन काम करावे.अन्य था आम्हाला त्यांचीही चौकशी करावी लागेल.

आज तहसीलदार कार्यालयात माजी आमदार व भाजप कार्यकर्ते गेले असता त्यांना कार्यालयात राष्ट्रपती व पंतप्रधान यांचे फोटो लावलेले दिसले नाही. याबाबत माजी आमदार पिचड, भाजप गट नेते व कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला दोन दिवसांत फोटो लावतो असे अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र दोन दिवसांत फोटो लावले नाही तर भाजप कार्यकर्ते हे फोटो लावतील असा इशारा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com