CM News : अजित पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हे जनता खपवून घेणार नाही...

Eknath Shinde क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नायगांव (ता. खंडाळा) येथे आले होते.
Eknath Shinde, Ajit Pawar
Eknath Shinde, Ajit Pawarsarkarnama

Satara News : धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबाबत केलेले वक्तव्य हे त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते. मुळात राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्याचा अधिकार कोणाला ही नाही. प्रत्येकाने आपण काय बोलतो, कसे वागतो, याचा विचारकेला पाहिजे. यापुढे महापुरुषांचा अपमान या राज्यातील जनता खपवून घेणार नाही, असा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी अजित पवारांचा Ajit Pawar नामोल्लेख टाळून दिला.

क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नायगांव (ता. खंडाळा) येथे आले होते. यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. एकनाथ शिंदे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगांवमध्ये मुख्यमंत्री म्हणून येण्याचे भाग्य मला मिळाले.

येथे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा वस्तू रुपातून ऐतिहासिक ठेवा जतन केला आहे. त्यांच्या त्यागातून प्रेरणा मिळत असून त्या काळी महिलांना शिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचे काम फुले दांपत्याने केले. आज त्यांच्या प्रेरणेतूनच महिला शक्ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे.

अजित पवारांच्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले, महापुरुषांचा अपमान करण्याचा अधिकार कोणाला नाही. धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबाबत केलेले वक्तव्य हे त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते. प्रत्येकाने आपण काय बोलतो, कसे वागतो याचा विचार केला पाहिजे. यापुढे महापुरुषांचा अपमान राज्यातील जनता खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com