Ajit Pawar News : आताच्या राज्यकर्त्यांना जनतेने नाकारलंय... अजित पवार

Koregaon APMC कोरेगाव येथे बाजार समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार व रामराजेच्या आभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
Ajit Pawar in Koregaon
Ajit Pawar in Koregaonsarkarnama

Koregaon News : बाजार समितीच्या निवडणुकीत आपण सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी कमी पडलो. पण, अपयशाने खचून जायचं नाही आणि यशाचा उन्माद करायचा नाही, असा सल्ला देऊन या निवडणुकीत १४७ पैकी ८० ठिकाणी महाविकास आघाडीच्या Mahavikas Aghadi स्थानिक पॅनेलची सत्ता आली तर भाजप व सत्ताधाऱ्यांना ४७ ठिकाणी तर ३८ ठिकाणी सर्वपक्षिय आघाड्या निवडून आल्या आहेत. या निकालातून आताच्या राज्यकर्त्यांना जनतेने नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते अजित पवार Ajit Pawar यांनी केली आहे.

कोरेगाव येथे बाजार समितीच्या Koregaon APMC नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार व रामराजेच्या आभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील,दीपक चव्हाण, नितीन पाटील, सुनील माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी आपण कमी पडलो. सातारा, वडूज, पाटण, कराड अशा ठिकाणी आपण कमी पडलो. पण या अपयशाने खचून जायचं नाही आणि यशाचा उन्माद करायचा नाही. तुमच्या सगळ्याच्या आशिर्वादाने व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय.

Ajit Pawar in Koregaon
Koregaon News : शशिकांत शिंदेंचा महेश शिंदेंना टोला; कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी त्यांची पोपटपंची...

बाजार समितीच्या निवडणुका इतक्या चुरशीच्या झाल्या की १४७ पैकी ८० ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता, भाजप व सत्ताधारी यांना ४७, तर ३८ ठिकाणी अपक्ष सर्वपक्षिय आघाडी निवडून आली आहे. या निवडणुकांच्या निकालावरुन आताच्या राज्यकर्त्यांना जनतेने नाकारले आहे. शिंदे, फडणवीसांचे सरकार आले की पैशाचा बाजार झाला आहे. तुम्ही सर्व जनतेने आपण महाराष्ट्राचा जबाबदार नागरीक म्हणून आत्मचिंतन करावे. हे सरकार आल्यापासून कशा प्रकारे कारभार चालला आहे.

Ajit Pawar in Koregaon
Satara APMC Election : स्थानिक आघाड्यांना साथ; अनैसर्गिक युतीला नाकारले

कोरेगावामध्ये पोलिस निरीक्षक पोस्ट असून ही कोणी चार्ज घेण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. मी आणि वळेस पाटील यांनी साताऱ्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. पण, तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. राज्यात व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिली व त्यांच्यानंतर पवार साहेब यांनी हे काम केले. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, असे म्हटले जाते. त्यांच्या जिल्ह्यात काय चालले आहे, असा प्रश्न त्यांनी केला.

Ajit Pawar in Koregaon
Devendra Fadanvis यांचा Congressवर निशाणा | BJP | Karnatak Election | Maharashtra | Sarkarnama

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com