Sharad Pawar resigns as NCP chief : पवारसाहेब घेतील तो निर्णय योग्यच असेल : श्रीनिवास पाटील

Shrinivas Patil खासदार पाटील म्हणाले, शरद पवार आणि मी 1958 पासून युवक कॉंग्रेसमधून सुरूवात केली.
Shrinivas Patil, Sharad Pawar
Shrinivas Patil, Sharad Pawarsarkarnama

-हेमंत पवार

Karad News : जेष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar साहेबांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय धक्कादायक आहे. महाभारतात श्रीकृष्णाने मी शस्त्र हातात घेणार नाही, असा पण केला होता. मात्र, जागेवर बसून मार्गदर्शन केले तरी सुध्दा युध्दात चमत्कार घडवून आणला होता. नुसते जागेवर बसून व मार्गदर्शन करूनही कलाटणी घडवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे ते जो काही निर्णय घेतील तो योग्यच असेल. आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी असू, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीनिवास पाटील Srinivas Patil यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन आज मुंबई येथे झालं. त्यावेळी पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावर प्रतिक्रीया देताना खासदार पाटील म्हणाले, शरद पवार आणि मी 1958 पासून युवक कॉंग्रेसमधून सुरूवात केली.

त्यांनी सलग 65 वर्षे केलेली समाजसेवा, त्यातील 55 वर्ष लोकप्रतिनिधित्व केल्यानंतर आता पुढच्या पिढीसाठी काहीतरी करण्याचा साहेबांची इच्छा दिसतेय. त्यामुळे ते सांगतील ते धोरण आणि जे बांधतील ते तोरण हिच आमच्या सारखा कार्यकर्त्याची भूमिका राहिल. फक्त ते पदावर राहणार नाहीत असे दिसून येत आहे.

Shrinivas Patil, Sharad Pawar
Satara NCP : राष्ट्रवादी 'युवक'ने केला एप्रिल फूल दिनी मोदी सरकारच्या विकासाचा वाढदिवस

शरद पवार यांचे नेतृत्व केवळ पद आणि निवडणुका पुरते मर्यादित नसून ते व्यापक व्यक्तिमत्व आहेत. पुढच्या पिढीला काहीतरी भरीव देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, जबाबदारी असलेल्‍या संस्थांना अधिक प्रभावी करण्यासाठी ते जास्त वेळ देणार आहेत असे दिसते. याचा अर्थ ते पूर्णपणे निवृत होतायतं असे नाही. कुठतरी राजकारणा पलीकडे जाऊन काम करण्याचा साहेबांचा निर्णय दिसतोय.

Shrinivas Patil, Sharad Pawar
Satara News : पवारांचा निर्णय कार्यकर्त्यांच्या जिव्हारी; भूमिका बदलावी... बाळासाहेब पाटील

त्यामुळे आम्ही सर्व त्यांचे मार्गदर्शन घेत राहू. महाभारतात श्री कृष्णाने मी शस्त्र हातात घेणार नाही असा पण केला होता. मात्र जागेवर बसून मार्गदर्शन केले तरी सुध्दा युध्दात चमत्कार घडवून आणला होता. पवार साहेब असेच आमचे उत्तुंग नेते आहेत. नुसते जागेवर बसून व मार्गदर्शन करूनही कलाटणी घडवण्याची ताकद त्यांच्यामधे आहे. मात्र त्यांनी अचानकपणे घेतलेल्या निर्णयासंदर्भात त्यांच्याशी भेटून चर्चा केल्यानंतरच अधिक सांगता येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Shrinivas Patil, Sharad Pawar
Ajit Pawar यांच्या विधानावर NCPच्या नेत्याचा आक्षेप | Congress | Politics | Maharashtra | Sarkarnama

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com