केतकी चितळेंविरोधात साताऱ्यात राष्ट्रवादीच्या महिलांची पोलिसांत तक्रार...

महाराष्ट्राला Maharashtra विविध क्षेत्रात गती Speed ​​in different areas देऊन लोकविकासाचे public development काम केले असून अनेक धोरणात्मक निर्णय श्री. पवार Sharad pawar यांनी घेतले आहेत.
केतकी चितळेंविरोधात साताऱ्यात राष्ट्रवादीच्या महिलांची पोलिसांत तक्रार...
NCP Mahilasarkarnama

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे कवितेच्या माध्यमातून विकृत विडंबन केल्याप्रकरणी केतकी चितळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीने पोलिस अधीक्षकांकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. यासंदर्भात महिला आघाडीच्या प्रभारी जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, युवती सेलच्या प्रदेश सचिव स्मिता देखमुख यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे.

सध्या व्टीट युद्ध सुरू असून यामध्ये केतकी चितळे यांनी उडी घेत खासदार शरद पवार यांच्यावर कवितेच्या माध्यमातून विकृत विडंबन केले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांत संतापाची लाट उसळली आहे.

NCP Mahila
'शरद पवार आमचा बाप, त्यांच्यासाठी मंत्रीपद गेलेतरी बेहत्तर'

या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा समिंद्रा जाधव व युवती सेलच्या प्रदेश सचिव स्मिता देखमुख यांनी केतकी चितळे यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. या निवेदनात म्हटले की, केतकी चितळे यांनी आपल्या व्टिटर व फेसबुक पेजवर एक कविता पोस्ट केली आहे. देशाचे नेते शरद पवार साहेब यांची राजकारण, समाजकारणात लोकनेते म्हणून उभी हयात गेली आहे.

NCP Mahila
हिंदू हा शब्द गुलामीचे प्रतीक, आताच झुगारा : लक्ष्मण माने

महाराष्ट्राला विविध क्षेत्रात गती देऊन लोकविकासाचे त्यांनी सातत्याने काम केले आहे. महाराष्ट्रात अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. अशा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले खासदार शरद पवार यांचे केतकी चितळे यांनी कवितेतून विकृत विडंबन केले आहे. या त्यांच्या आक्षेपार्य पोस्टमुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येणार आहे. अशा प्रवृत्ती समाजासाठी घातक आहेत.

NCP Mahila
Video: द्वेष परसविणाऱ्यांना धडा शिकवू; शरद पवार

त्यामुळे त्यांच्यावर कलम ५०५ (२), ५००, ५०१, ५०७, १५३, ए आयपीसी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा व अशा प्रवृत्तींना आळा बसवावा, असे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी समिंद्रा जाधव यांच्यासह कुसुमताई भोसले, उषाताई पाटील, डॉ. सुनिता शिंदे, रशिदा शेख, स्मिता देशमुख, नलिनी जाधव, नुपुर नारनवर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.