Parth Pawar & MP Dr. Sujay Vikhe Patil
Parth Pawar & MP Dr. Sujay Vikhe PatilSarkarnama

पवार-विखे वादाला तरूणाई मैत्रीत बदलू पाहतेय...

उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांचे चिरंजिव पार्थ पवार ( Parth Pawar ) व खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( MP Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी काल (शनिवारी) औरंगाबाद ते मुंबई असा एकत्र विमान प्रवास केला.

अहमदनगर : पवार आणि विखे ही दोन राजकीय घराणी महाराष्ट्रात मोठी समजली जातात. या दोन्ही घराण्यांतील वादही जुना आहे. मागील तीन पिढ्यापासून हा वाद सुरूच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काल (शनिवारी) औरंगाबाद ते मुंबई असा एकत्र विमान प्रवास केला. या प्रवासाचे काही फोटो डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. या फोटोवर त्यांनी लिहिले Friendship Beyond Boundaries..!! म्हणजेच मैत्री सीमेपलिकडे. त्या सीमेला राजकीय इतिहासातील अर्थ आहे. Pawar-Vikhe seeks to turn youth into friendship...

पवार कुटूंब व विखे कुटूंब यांच्या वादाला जवळपास 55 वर्षांचा आहे. हा वाद आता नवीन पिढी संपुष्टात आणू पाहत आहे. असे खासदार सुजय विखे पाटलांना सांगायचं आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार हे विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिल्या सहकारी तत्त्वावरील प्रवरा सहकारी साखर कारखान्यात काही काळ अधिकारी होते. त्यावेळी शरद पवारही प्रवरानगरमध्ये होते आणि तिथल्या महात्मा गांधी विद्यालयात त्यांनी काही काळ शिक्षण घेतलं.

Parth Pawar & MP Dr. Sujay Vikhe Patil
मी लिहून देतो, जिल्हाधिकारी त्यांच्यावर कारवाईचे धाडस दाखवू शकत नाहीत...

एककाळ राज्यातील काँग्रेसमध्ये यशवंतराव चव्हाण व शंकरराव चव्हाण असे दोन गट होते. यशवंतराव चव्हाणांनंतर राज्यातील नेतृत्वावरून शरद पवार आणि शंकरराव चव्हाण असे दोन गट तयार झाले. दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील हे पहिल्यापासून शंकरराव चव्हाण गटाचे. त्यामुळे ही दोन घराणी नेहमीच विरोधात होती. मात्र या घराण्यांतील वाद विकोपाला गेला तो 1991च्या लोकसभा निवडणुकीत.

Parth Pawar & MP Dr. Sujay Vikhe Patil
सुजय विखे म्हणाले, अजित पवारांच्या आदेशानेच नगर जिल्ह्यातील गावांत लॉकडाऊन

ऐतिहासिक निवडणूक आणि आचार संहिता

बाळासाहेब विखे पाटील जाहीरपणे राजीव गांधींच्या विरोधात बोलत असत. त्यामुळे 1991 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अहमदनगर मतदारसंघात यशवंतराव गडाख हे काँग्रेसचे उमेदवार होते. तर बाळासाहेब विखे पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यानं विखेंनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यांना जनता दलाचा पाठिंबा होता. गडाखांना निवडून आणण्याची जबाबदारी राजीव गांधींनी शरद पवारांवर सोपविली होती. यशवंतराव गडाख हे अटीतटीच्या लढतीतून निवडून आले. त्यानंतर बाळासाहेब विखे-पाटील यांनी निवडणुकीतील प्रचारावर आक्षेप घेत न्यायालयात खटला दाखल केला. बाळासाहेब विखे पाटलांनी शरद पवार व यशवंतराव गडाख यांच्या भाषणांचे पुरावे न्यायालयात सादर केले. खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला. या याचिकेत विखे पाटलांनी शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांच्या भाषणाचे पुरावेही जोडले होते. या खटल्यात शरद पवारांना अनेक वेळा कोर्टकचेऱ्या कराव्या लागल्या आणि बदनामीला सामोरं जावं लागलं. या खटल्यात न्यायालयाने शरद पवार यांच्यावरही ठपका ठेवला. गडाखांना सहा वर्षं निवडणुकीपासून वंचित राहावं लागलं. पुढे शरद पवारांनी या खटल्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आणि बाळासाहेब विखे पाटील यांना विजयी घोषित करण्याचा निर्णय रद्द झाला. या प्रकरणी शरद पवारांना बजावलेली नोटीसही रद्द करण्यात आली. तोपर्यंत निवडणुकीत आचारसंहिता काय असते हे कुणाला जास्त माहिती नव्हते. या खटल्याने देशाला निवडणुकीतील आचारसंहिता शिकविली.

Parth Pawar & MP Dr. Sujay Vikhe Patil
पार्थ पवार यांच्या 'त्या' ट्विट ला 'इतके' हजार लाईक्स!

आठवलेंचा पराभव

2009च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांनी रामदास आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती. त्याबदल्यात अहमदनगर दक्षिण मतदारसंघ बाळासाहेब विखेंसाठी सोडण्याचे ठरले होते. मात्र ऐन वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने दक्षिणेत उमेदवार दिला. त्यामुळे विखेंनी आठवलेंच्या विरोधात प्रचार करत त्यांचा पराभव केला. त्याच वर्षी विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने जोरदार लढत दिली. या अटीतटीच्या लढाईत राधाकृष्ण विखे पाटील 12 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले.

Parth Pawar & MP Dr. Sujay Vikhe Patil
बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्रात शरद पवार हेच लक्ष्य

अजित पवार-राधाकृष्ण विखे वाद

राज्यात आघाडीच्या कार्यकाळात अजित पवार यांच्याकडे ऊर्जामंत्रीपद होते. अजित पवारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताब्यात असलेली मुळा-प्रवरा ही सहकारी वीज कंपनी थकीत रकमेमुळे बरखास्त करण्याचे आदेश दिले होते.

Parth Pawar & MP Dr. Sujay Vikhe Patil
खासदार विखे पाटलांचा तो मुद्दा आमदार पवार यांनी खोडून काढला

डॉ. सुजय विखेंच्या उमेदवारीला नकार

2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी निवडणूक लढविण्याचे ठरविले. शिर्डी लोकसभा मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने काँग्रेसने अहमदनगर दक्षिण मतदारसंघ मागितला. मात्र शरद पवार यांनी तो देण्यास नकार दिला. अखेर डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि निवडणूकही जिंकली.

Parth Pawar & MP Dr. Sujay Vikhe Patil
विखे-पवार संघर्षावर चालणाऱ्या चुली बंद करणार: सुजय विखे

डॉ. सुजय विखे-रोहित पवार

रोहित पवार हे कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविण्यापूर्वी डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट झाल्याचेही सांगितले जाते. तीन दिवसांपूर्वी डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वराज्य ध्वज यात्रेला लक्ष्य करत रोहित पवार यांचे नाव न घेता टीका केली होती.

Parth Pawar & MP Dr. Sujay Vikhe Patil
विखे, थोरात यांच्यावर माझे सारखेच प्रेम, तर शरद पवार देव माणूस : इंदुरीकर महाराज

पवार व अहमदनगर नाते

आमदार रोहित पवार यांचे आजोबा अप्पासाहेब पवार हे प्रवरा साखर कारखान्यात अधिकारी होते. शरद पवारांचे काही काळ शिक्षण प्रवरा लोणीत झाले. त्यांनी शेतकरी आंदोलनेही याच ठिकाणावरून सुरू केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजोळ राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवराचे. शरद पवार यांच्या बहिण मिनाताई जगधने यांचे सासर श्रीरामपूरचे. त्यामुळे पवार कुटूंबासाठी अहमदनगर जिल्हा हा राजकीय तसाच नातेसंबंधामुळे भावनिकही विषय आहे.

Parth Pawar & MP Dr. Sujay Vikhe Patil
विखे-पवार वाद मिटविण्याची आमदार पवार यांची भूमिका, पण... !

शरद पवारांनी काढलेला पहिला मोर्चा

शरद पवार हे 1960च्या दशकात शिक्षणासाठी प्रवरा लोणीत होते. तिथेच त्यांनी आपल्या आयुष्यातील पहिला मोर्चा काढला. त्यावेळी ‘गोवामुक्ती’ची चवळवळ सुरु होती. 1954 पासून या चळवळीला विशेष गती मिळाली. पोर्तुगीजांनी सत्याग्रहींना अमानुष वागणूक देण्यास सुरवात केली. पोर्तुगीजांच्या गोळीबारात अहमदनगर जिल्ह्यातील तुळशीदास बाळकृष्ण हिरवे म्हणजेच हिरवे गुरूजी हुतात्मा झाले. वर्तमानपत्रात ही बातमी वाचताच शरद पवारांनी विद्यार्थ्यांना जमविले. या घटनेच्या निषेधार्थ शाळा बंद पाडली. तसेच सहाशे-सातशे विद्यार्थी बरोबर घेऊन त्यांनी एक मोर्चा काढला. वाटेत येणारी बाजारपेठ देखील या मोर्चाने बंद पाडली. त्यानंतर हा मोर्चा थेट प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या दिशेने निघाला. तिथे मात्र शरद पवार आणि विठ्ठलराव विखे पाटील समोरासमोर आले. विखे पाटील पवारांना म्हणाले ‘बंद कशासाठी ?’ पवारांनी झालेली घटना विखे पाटलांना सांगितली आणि त्याच्या निषेधार्थ बंद पाळावा अशी आमची भूमिका असल्याचे देखील सांगितले. विखे पाटलांनी शरद पवारांना विचारलं ‘बंद पाळून गोवा भारतात कसा विलीन होणार ?, अन बंद पाळल्याने जर गोवा भारतात विलीन होणार असेल तर मी माझा कारखाना कायमस्वरूपी बंद करायला तयार आहे.’ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या या उत्तराने शरद पवार आणि मोर्चेकरी विद्यार्थी निरुत्तर झाले. या मार्चाने मात्र शरद पवारांना कोणत्याही कृती पूर्वी तार्कीक विचार करणाची महत्त्वपूर्ण शिकवण दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com