Sharad Pawar Retirement : पवार साहेबांनी कधीच निवृत्त होऊ नये... शशिकांत शिंदे

Shashikant Shinde आमदार शशिकांत शिंदे म्हणाले,जे आज देशाचे नेतृत्व करत आहेत त्यांना पर्याय उभा करण्याची आणि देशाला व राज्याला एकत्रित करण्याची ताकद शरद पवार यांच्यामध्ये आहे.
Sharad Pawar, Shashikant Shinde
Sharad Pawar, Shashikant Shindesarkarnama

-राजेंद्र वाघ

Shashikant Shinde News : शरद पवार Sharad Pawar आणि राष्ट्रवादी NCP हे एक समीकरण आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची केलेली घोषणा हा आम्हाला धक्काच आहे. माणसांत, जनतेत असणारा नेता असाच कार्यरत राहावा, त्यांनी कधीच निवृत्त होऊ नये. ही वैयक्तिक व प्रामाणिक इच्छा आहे, अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, "जे आज देशाचे नेतृत्व करत आहेत त्यांना पर्याय उभा करण्याची आणि देशाला व राज्याला एकत्रित करण्याची ताकद शरद पवार यांच्यामध्ये आहे. एक अनुभवी नेतृत्व म्हणून आपण सर्वजण त्यांच्याकडे बघतो. आज त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होते. त्यावेळी अचानकच त्यांनी निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये फार मोठी पोकळी निर्माण होऊ शकते.

सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांनी फक्त पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचे सांगितले आहे. पण संपर्क व पक्ष वाढीसाठी ते वेळ देणार आहेत. शरद पवार व राष्ट्रवादी आणि शरद पवार व महाराष्ट्र हे वेगळे होऊ शकत नाहीत. त्यामुळे पद हे महत्वाचे आहे, त्या पदाच्या माध्यमातून शरद पवार यांचे नेतृत्व देशाला एकत्र आणू शकते.

Sharad Pawar, Shashikant Shinde
Sharad Pawar Retirement ; आज नेमकं काय घडलं, त्याचे परिणाम काय ? | NCP | Sarkarnama

पद नसेल म्हणून त्यांचे महत्त्व कमी होणार नाही; परंतु सामान्य कार्यकर्ते व जनतेची जी अपेक्षा आहे, ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळे त्यांनी निवृत्ती घेणे आम्हाला मान्य नाही. यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार म्हणून हा सातारा जिल्हा शरद पवार यांच्याकडे बघतो. या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून दूर होण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे आम्हाला दुःख आहे.

Sharad Pawar, Shashikant Shinde
Prithviraj Chavan on Karnataka Election: राष्ट्रवादीमुळे भाजपला फायदा होणार? पृथ्वीराज चव्हाणांचं सूचक वक्तव्य

आज महाराष्ट्राला व देशाला शरद पवार यांची खरी गरज आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचा पुरोगामी विचार टिकवण्यासाठी शरद पवार यांनी तूर्तास हा निर्णय मागे घ्यावा. कारण वेगवेगळे तर्क मांडले जातील व त्यास वेगळ्या प्रकारची राजकारणाची फोडणी दिली जाईल. वयाचा विचार करून त्यांनी भूमिका घेतली असली, तरी मला वैयक्तिक वाटते, की त्यांनी कधीच निवृत्त होऊ नये. माणसांमध्ये, जनतेमध्ये असणारा नेता असाच कार्यरत राहावा, ही आमची प्रामाणिक इच्छा असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

Sharad Pawar, Shashikant Shinde
Sharad Pawar Retirement : सुप्रिया सुळेंच्या अध्यक्षपदाबाबत मोठी अपडेट ; भुजबळ म्हणाले, "सुळे अध्यक्ष व्हायला..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in