Patan : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी शंभूराज देसाईंनी दिली ही अनोखी भेट...

Shambhuraj Desai मंत्री शंभूराज देसाई यांच्या या संकल्पनेला पाटण विधानसभा मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
Ekanth Shinde, Shambhuraj Desai
Ekanth Shinde, Shambhuraj Desaisarkarnama

Patan News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या वाढदिनी आज ठाणे ,सातारचे पालकमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांच्या संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या तब्बल २७६ नवीन शाखांचा प्रारंभ केला. मतदारसंघात पक्ष संघटना वाढविण्याच्या दृष्टीने वाढदिवसाची ही एक अनोखी भेट मुख्यमंत्री शिंदे यांना दिली आहे.

मंत्री शंभूराज देसाई यांच्या या संकल्पनेला पाटण विधानसभा मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट देत पाटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्यावतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर कै. आनंद दिघे यांची माणसुकीची शिकवण यांच्या आधारे बाळासाहेबांची शिवसेना जनसेवेत कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण या सूत्रानुसार कार्यरत आहे.

Ekanth Shinde, Shambhuraj Desai
Ajit Pawar : अजितदादा मुख्यमंत्री झाले असते तर, राष्ट्रवादी वाढली असती : शंभूराज देसाई

आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २७६ शाखा जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी तत्पर राहतील. सोबतच युवा सेना, महिला आघाडीच्या माध्यमातून युवकांसह महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच युवा सेना व महिला आघाडी यांच्या ५९ शाखांचा ही प्रारंभ करण्यात आला.

Ekanth Shinde, Shambhuraj Desai
Patan : बाळासाहेबांच्या शिवसेनेचे १६१ सदस्य, १८ सरपंच बिनविरोध... शंभूराज देसाई

वाढदिवसाचे औचित्य साधून पाटण मतदारसंघातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत व ग्रामीण रुग्णालय पाटण व ढेबेवाडी येथे सर्व रोग निदान व रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या एका दिवसांमध्ये २७६ शाखांचा प्रारंभ केला. याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपक्रमाचे कौतुक करुन या मतदारसंघातील पक्षाचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे अभिनंदन केले.

Ekanth Shinde, Shambhuraj Desai
Satara : ठाकरे सेना तुम्हीच राष्ट्रवादीच्या मांडीवर नेऊन बसवली... शंभूराज देसाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com