Satara : दुय्यम निबंधक कार्यालयात रंगली पार्टी... बिर्याणी, तंदूरवर मारत होते ताव...

सातारा तहसील कार्यालयाच्या Satara Tahashil office आवारातच सहायक दुय्यम निबंधक Assistant Sub-Registrar कार्यालय आहे. येथे जमीन खरेदी-विक्रीचे दस्त होतात.
Party In Government office
Party In Government office sarkarnama

सातारा : सातारा येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय क्र. एकच्या कार्यालयात आज (बुधवारी) दुपारी सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांची पार्टी रंगली होती. चक्क तंदूर आणि बिर्याणीच्या मेजवानीचा आनंद घेत असल्याचे निदर्शनास आले. बिर्याणी व तंदूरवर ताव मारत भारत-बांगलादेश क्रिकेट सामना पाहण्यात मग्न झाले होते. याप्रकाराची एकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली असून आता ते काय कारवाई करणार याची उत्सुकता आहे.

सातारा तहसील कार्यालयाच्या आवारातच सहायक दुय्यम निबंधक कार्यालय आहे. सातारा तालुक्यातील समाविष्ट गावांमधील जमीन खरेदी-विक्रीचे दस्त या कार्यालयात होत असल्याने येथे चांगलीच गर्दी असते. बुधवारीही येथे नेहमीप्रमाणे गर्दी होती. मात्र, दुपारच्या सुमारास कार्यालयातच बिर्याणीचा भरलेला टोप व त्यासोबत तंदुरी चिकन आणण्यात आले. दुपारच्या सुट्टी आणि तासभर त्यांनी यावर ताव मारला. त्याबरोबरच भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट मॅच ही बघत होते.

कार्यालयातच या अधिकारी व कर्मचाऱ्यांची ही पार्टी रंगली होती. कार्यालयात मेजवणीचा हाप्रकार सुरू असतानाच बाहेर मात्र या कार्यालयात कामासाठी आलेले पक्षकार ही पार्टी कधीसंपतेय यांची वाट पहात ताटकळत उभे होते. यासंदर्भात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

Party In Government office
फुकट बिर्याणी क्लिप : त्या पोलिस उपायुक्तांची सायबर सेलकडे अद्याप तक्रार नाही

दरम्यान, यासंदर्भात दस्त नोंदणी विभागाचे प्रमुख मंगेश खामकर यांच्याशी संपर्क साधलाअसता त्यांनी मी स्वतः आठ दिवसांपासून रजेवर असून सातारा तहसिल कार्यालयाजवळीत आमच्या कार्यालयात घडलेल्या प्रकार माझ्या कानावर आलेला आहे. हा प्रकार दुपारच्या सुट्टीत झाल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रत्यक्षात संबंधित लोक काही स्टॅम्प विक्रेत्यांची तक्रार घेऊन आले होते. त्यावेळी त्यांना लेखी तक्रार देण्याची मागणी आमच्या तेथील अधिकाऱ्यांनी केली होती.

Party In Government office
मलिकांचे आरोप म्हणजे; बिरबलाच्या कथेतील न शिजलेली ‘बिर्याणी’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in