Maan BJP News : परिक्रमा पंकजा मुंडेंची; चर्चा खासदार-आमदारांच्या अनुपस्थितीची

Pankaja Munde पंकजा मुंडे यांनी धार्मिक स्थळांना भेटी व जनतेशी संवाद या उद्देशाने शिव-शक्ती परिक्रमा काढली आहे. बुधवारी ही परिक्रमा सातारा जिल्ह्यात आली होती.
Pankaja Munde, Jaykumar Gore, Ranjitsinh Naik Nimbalkar
Pankaja Munde, Jaykumar Gore, Ranjitsinh Naik Nimbalkarsarkarnama

-रूपेश कदम

Maan Political News : महाराष्ट्राच्या माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या शिव-शक्ती परिक्रमेला फलटण-माण-खटाव तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र या संपुर्ण परिक्रमेत खासदार रणजितसिंह निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. खासदार - आमदार यांच्या अनुपस्थितीची चर्चा चांगलीच रंगली होती.

पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी धार्मिक स्थळांना भेटी व जनतेशी संवाद या उद्देशाने शिव-शक्ती परिक्रमा काढली आहे. बुधवारी ही परिक्रमा सातारा जिल्ह्यात Satara आली होती. लोणंद ते मायणी असा त्यांचा असा या परिक्रमेचा जिल्ह्यातील मार्ग होता. या परिक्रमेदरम्यान स्वागत, दर्शन, नाश्ता, लंच असे पाँईट निवडण्यात आले होते.

यात सकाळी साडे अकराच्या सुमारास खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट व नाश्त्याचे नियोजन करण्यात आले होते. पंकजा मुंडे आल्या त्यावेळी त्यांचे स्वागत खासदार निंबाळकर यांच्या पत्नी जिजामाला निंबाळकर यांनी केले. तर शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाचे दर्शन घेतेवेळी पंकजा मुंडे यांच्या स्वागताला खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते.

त्यानंतर त्या दहिवडी येथे आल्या असता त्यांचे स्वागत आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे व वडील भगवानराव गोरे यांनी केले. सातारा जिल्ह्यातील या संपूर्ण परिक्रमेत सर्वपक्षीय नेतेमंडळी, भाजपचे कार्यकर्ते तसचे मुंडे कुटुंबीयांवर मनापासून प्रेम करणारा वंजारी समाज यांनी पंकजा मुंडे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

Pankaja Munde, Jaykumar Gore, Ranjitsinh Naik Nimbalkar
Maan News : माण, खटावला दुष्काळ जाहीर करण्यासाठी 'स्वाभिमानी'ने अडवला रस्ता

पण परिक्रमा नियोजित असताना खासदार व आमदार हे दोघेही अनुपस्थित असल्याने चर्चेला उधाण आले होते. रणजितसिंह निंबाळकर यांच्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी अचानक नियोजन करुन सुध्दा पंकजा मुंडे यांनी वेळ दिली होती व पळशी (ता. माण) येथे जंगी सभा घेतली होती. तसेच विधानसभा निवडणुकीवेळी अतिशय व्यस्त असताना मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी जयकुमार गोरे यांच्यासाठी भाषण केले होते.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in