Tanajai Sawant : 'माढ्याचे पार्सल' परत पाठविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; ठाकरेंच्या माजी आमदाराचे सावंतांना उघड इशारा!

Paranda : "पैसा अन् सत्तेचा माज लवकरच उतरणार..."
Tanajai Sawant : Dnyaneshwar Patil
Tanajai Sawant : Dnyaneshwar PatilSarkarnama

परंडा : माझ्या प्रयत्नाने, साथसोबतीने तालुक्यात शिरकाव करणाऱ्या तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी हिम्मत असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन निवडून येवुन दाखवावे.

माढ्याचे पार्सल परत पाठविल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, असा इशाराच शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी रविवार (ता .५) रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिला. यामुळे परंडाच्या स्थानिक पातळीवर ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे.

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे परंडा मतदारसंघातील माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदा वरुन नुकतेच अपात्र ठरविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी शहरातील विश्वसिध्दी येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जिल्हाप्रमुख गौतम लटके, जनार्दन मेहेर, मैनोद्दीन तुटके,रईस मुजावर आदी उपस्थित होते.

Tanajai Sawant : Dnyaneshwar Patil
Chhatrapati Sambhajinagar News : औरंगजेबाचे पोस्टर झळकावणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोध सुरू..

पाटील पुढे म्हणाले,'तानाजी सावंत यांना बोटाला धरून जिल्ह्याच राजकारण शिकवलं. परंडा मतदारसंघात मोलाचं सहकार्य करुन राजकारणात संधी देऊन आमदार केले.

त्यांनीच माझे आजारपणाचा फायदा घेवून, मी आय.सी.यू. मध्ये असताना जिल्हा बँकेच्या संचालक पदाचे मला नोटीस पाठवून त्रास देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. ७ फेब्रुवारी रोजी तारीख ठेवलेली असताना, त्याची नोटीस मला १० फेब्रुवारी रोजी देण्यात आली.

मी पुणे येथील रुग्णालयात ११ फेब्रुवारी रोजी पर्यंत आयसीयूमध्ये उपचार घेत असताना, सावंत यांनी पुर्वग्रहदुषित कपटी राजकारण केले.दिलेल्या नोटीसला उत्तर देण्याची मला संधीच दिली नाही.सावंत यांनी कपटाने रचलेला डाव तालुक्यातील जनता उधळुन लावल्याशिवाय राहणार नाही."

"आगामी काळात सावंतच्या माध्यमातून आलेले पार्सल परत पाठविल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आमदार सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंताच्या खांदयावर परंडा तालुक्यात गुलाल टाकण्याच पहिले काम मी केले.

त्यासाठी स्वतःच्या भावाला सिध्देश्वर पाटील यास जिल्हा परिषदेची उमेदवारी न देता धनंजय सावंत यांना उमेदवारी दिली व निवडुन आणलं. तसेच जिल्हा परिषदेत सभापती केले.

या काळात तानाजी सावंत आमदार सुध्दा नव्हते. तालुक्यातील शेतक-याच्या हितासाठी कारखाना आणला सावंताना आलेल्या भैरवनाथ कारखाना उभारणीत सगळ्या अडचणी सोडविण्यासाठी अनेकांचा विरोधाला न जुमानता मी पुढाकार घेतला.

ज्यांना हाताला धरून उभे केले, त्यांनी आपल्याला मानसिक त्रास देण्याची भुमिका घेतली," असेही पाटील म्हणाले.

Tanajai Sawant : Dnyaneshwar Patil
Chinchwad : अजित पवार - राहुल कलाटे - नाना काटे रात्री दोन वाजेपर्यंत एकत्र बसले : मार्ग का निघाला नाही?

"पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मला व माझे कुटुंबियांना त्रास देण्याच्या दुष्ट हेतुने, शासकीय यंत्रणेचा वापर करुन कर्मचा-यांवर दबाव टाकून तथ्यहिन प्रकरणी, खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे.

भविष्यात माझ्यासह माझ्या मुलावर खोट्या केसेस करण्याची शक्यता नाकारता येत नाही." सत्ता येत असते, जात असते, सत्तेचा माज येवू दयायचा नसतो.

सावंताना आलेला पैश्याचा अन सत्तेचा माज थोड्याच दिवसात मतदारसंघातील जनता नक्कीच येणाऱ्या निवडणुकीत उतरवेल, असा मला विश्वास असल्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in