
-रमेश धायगुडे
Pankaja Munde Shivshakti Rally Lonand : मी दुष्काळी भागातीलच असून शासनाने दुष्काळावर लक्ष केंद्रीत करुन ठोस उपाय योजना कराव्यात. त्यासाठी मी स्वतः शासनाकडे प्राधान्याने पाठपुरावा करणार आहे, अशी ग्वाही माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे Pankaja Munde यांची शिव -शक्ती परिक्रमा रॅली जेजुरीहून शिखर शिंगणापूरकडे जाताना आज (ता. ६) लोणंद Lonand येथे अहिल्यादेवी होळकर स्मारक चौकात आगमन झाले. सातारा जिल्ह्याच्यावतीने त्यांच्या रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी येथील स्मारकातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अनुप सूर्यवंशी, खंडाळा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध गाढवे, महिला तालुका अध्यक्षा गितांजली क्षीरसागर, नारायणराव साळुंखे, दिपाली संदीप शेळके, तृप्ती घाडगे, ज्योती डोणीकर, बापूराव धायगुडे, राहुल घाडगे, अतुल पवार, श्रीकांत घाटे, प्रदिप क्षीरसागर, हर्षवर्धन शेळके - पाटील, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, शिवशक्ती परिक्रमेला सर्वस्तरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद का मिळत आहे, हे मलाही माहिती नाही. दुष्काळ व पाणी टंचाईच्या प्रश्नांवर त्या म्हणाल्या, मी दुष्काळी भागातीलच आहे. शासनाने दुष्काळावर लक्ष केंद्रीत करुन ठोस उपाय योजना कराव्यात.
मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे
जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. या हल्ल्याबाबत आम्हाला सहानुभूती आहे. मराठा समाजाला खरा अर्थाने न्याय मिळाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
.. अनं, गर्दीत घुसला चोरटा
माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमेचे आज लोणंद येथे अहिल्यादेवी होळकर स्मारकात आगमन झाले. त्यावेळी झालेल्या गर्दीचा फायदा उठवत गर्दीत घुसलेल्या कोणीतरी भाजपचे लोणंद शहरातील युवा नेते हर्षवर्धन शेळके - पाटील यांच्या खिशातील सहा हजार रुपये काढून घेतले. मात्र, ही बाब हर्षवर्धन शेळके यांच्या उशीरा लक्षात आली. त्याबाबत येथे चर्चा होती.
Edited By Umesh Bambare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.