पाथर्डीत शक्तीप्रदर्शन करत पंकजा मुंडे देणार भाजपला संदेश...

Pankaja Munde latetst news| पंकजा मुंडेंनी ट्विटरवरील प्रोफाईल फोटो बदलल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
पाथर्डीत शक्तीप्रदर्शन करत पंकजा मुंडे देणार भाजपला संदेश...
Pankaja Munde latetst news

अहमदनगर : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधान परिषदेत उमेदवारी डावलल्यापासून त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत.राज्यभरात त्यांच्या समर्थनार्थ अनेक निदर्शनेही झाली. धक्कादायक म्हणजे त्यांचे समर्थक मुकुंद गर्जे यांनी विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकारही समोर आला होता. पंकजा मुंडेंची भाजपात घुसमट होत असल्याची भावना त्यांचे कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. (Pankaja Munde latetst news)

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे राज्यात नव्हत्या. पण आता त्या मुकुंद गर्जे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या मंगळवारी (२१ जून) पंकजा मुंडे पाथर्डीत आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधुन त्या मोहटादेवीचे दर्शन घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काय बोलणार याकडे पाथर्डीकरांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अनेक दिवसांनी पंकजा मुंडे मोहटादेवीच्या दर्शनाला येणार असल्याने परीसरात मुंडे समर्थक फलक लावुन त्यांचे स्वागताची जय्यत तयारीही सुरु केली आहे.

Pankaja Munde latetst news
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला ; दोन गोळ्या झाडल्या

- पंकजा मुंडे नाराज आहेत का?

विधान परिषदेची उमेदवारी मिळाली तर संधीचं सोनं करीन, असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या दिवशी गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात केलं होतं. पक्ष नेतृत्वाकडून आपल्याला ही संधी दिली जाईल, अशी त्यांना अपेक्षाही होती. पण विधान परिषदेत त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. असं असतानाही पंकजा मुंडेंची यावर एकही प्रतिक्रिया आली नाही. पण त्यांचे कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले. कार्यकर्त्यांची ही अस्वस्थता मराठवाड्यातील अनेक ठिकाणी निदर्शनांमधून दिसून आली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलले, पण पंकजा मुंडेंनी मात्र यावर मौन राखले आहे. या मौनातच त्यांची अस्वस्थता दिसून येतेय की अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

- ट्विटर प्रोफाईल बदलल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण

त्यातच काल पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटरवरील प्रोफाईल फोटो बदलला. पंकजा मुंडेंनी आपला एक फोटो ट्विटर प्रोफाईलवर शेअर केला आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यात नाराज असूनही पंकजा मुंडे पूर्ण आत्मविश्वासाने पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. किंवा त्या आणखी काही मोहिमेसाठी तयारी करत आहेत का, असे अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे मंगळवारी काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in