Pankaja Munde : पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

मुंडे समर्थक गटाने सावरगाव येथे पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांच्या दसरा मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Bjp Leader Pankaja Munde News, Beed
Bjp Leader Pankaja Munde News, BeedSarkarnama

उमेश मोरगावकर

Pankaja Munde : दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे समर्थक व विरोधक यांच्यात दोन गट पडले असून, मुंडे समर्थक गटाने बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले असताना, दुसऱ्या गटाने भगवानगडाच्या पायथ्याला मेळावा घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनी गडावर भाषणबंदी केल्यानंतर मुंडे यांनी 2017 पासून सावरगाव येथे मेळावा घेण्यास सुरवात केली आहे. या वर्षीही हा मेळावा होणार असून, त्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुक्यातील मुंडे समर्थकांनी केले असले, तरीही आता भगवानगड कृती समितीने गडाच्या पायथ्याला मेळावा घेण्याची तयारी सुरू केली आहे. हा मेळावा घेऊ द्यावा, अशी परवानगी भारजवाडीतील आजिनाथ बटुळे यांनी पोलिसांकडे मागितली.

Bjp Leader Pankaja Munde News, Beed
Pankaja Munde यांना सत्तेचा प्रसाद मिळेल का ? ; फडणवीसांच्या गणपतीचे घेतले दर्शन

या मेळाव्यासाठी शिवराज बटुळे यांनी आपली जागा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, पोलिसांनी मेळाव्याला परवानगी नाकारली आहे. मेळाव्याला गडाच्या पाच किलोमीटर परिसरात परवानगी देऊ नये, असा ठराव परिसरातील खरवंडी कासार, मालेवाडी व घोगस पारगाव या ग्रामपंचायतींनी केला आहे.

Bjp Leader Pankaja Munde News, Beed
Pankaja Munde मी हात जोडून विनंंती करते...; नाराजीच्या चर्चेवर पंकजा मुंडे अक्षरश: वैतागल्या

याशिवाय मुख्य गडावर मेळावा घेऊ देऊ नये, असे पत्रही नामदेवशास्त्री यांनी पोलिसांना दिले आहे. तरीही गडाच्या पायथ्याला मेळावा घेण्यासाठी औरंगाबाद येथील बाळासाहेब सानप यांनी पुढाकार घेतला आहे. या मेळाव्यास आता पंकजा मुंडे समर्थकांनी विरोध केल्याने, या विषयावर येत्या काही दिवसांत रणकंदन होऊन पोलिसांची डोकेदुखी वाढणार असल्याचे मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com