पंकजा मुंडे भाजपला ब्लॅकमेल करतायेत; राणे समर्थकाचा आरोप

Pankaja munde news| पंकजा मुंडे यांना विधान परिषद निवडणुकीत डावलल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर दगडफेक केली होती.
Pankaja Munde news,
Pankaja Munde news,

सोलापूर : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधान परिषद निवडणुकीत डावलल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. तर कराड यांच्या कार्यकर्त्यांनी ही मुंडे समर्थकांना मारहाण केली. त्याच दरम्यान तुळजापुरात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मोटार अडवल्याचा प्रकार घडला. (Pankaja Munde news)

या प्रकारामुळे भाजपातील (BJP) खदखद बाहेर पडत असल्याचे बोलले जात आहे.असे असतानाच आता पंकजा मुंडे भाजपाला ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप पूर्वीचे काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि भाजपमधील राणे समर्थक संतोष पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांना प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात संतोष पाटील यांनी म्हटलं आहे.

Pankaja Munde news,
विरारचे ठाकूर कुणाचं गणित बिघडवणार? मित्राची भेट घेत ‘भाईं’नी घातलं साकडं

“पंकजा मुंडे केवळ राजकीय द्वेषापोटी फडणवीस यांची प्रतिमा बहुजन समाजाविरोधी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा पक्षांतर्गत जाणीवपूर्वक सुरू असलेला संघर्ष योग्य नाही, असा आरोप संतोष पाटील यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रात पर्याय नसल्याचा दावाही पाटील यांनी केला आहे.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार असल्याचे सांगून पंकजा मुंडे भाजपला नेहमीच ब्लॅकमेल करतात. वारसदार जन्माने नव्हे, तर कर्तृत्वाने ठरत असतो, याचा विचार पंकजा मुंडे यांनी केलेला दिसत नाही. शरद पवार, नितीन गडकरी यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दिल्लीत शब्दाचे वजन असलेला दुसरा नेता नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सुद्धा फडणवीसांची नेहमीच पाठराखण करतात, असंही पाटील यांनी म्हटलं आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com