Sangli Bazar samiti Election : दिप्या कुठे आहे?; त्याला मस्ती आली आहे : विजयी उमेदवाराच्या समर्थकाकडून पराभूताच्या कुटुंबीयास धमकी

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराच्या घरासमोर मिरवणूक नेऊन नारळ फोडून, तलवारी नाचवत दहशत माजवण्याचा प्रकार घडला.
Sangli Bazar Samiti
Sangli Bazar SamitiSarkarnama

सांगली : सांगली (Sangli) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराच्या घरासमोर मिरवणूक नेऊन नारळ फोडून, तलवारी नाचवत दहशत माजवण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी प्रतिभा दीपक ऊर्फ दिलीप माने आणि उषाताई बजरंग फोंडे यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात स्वतंत्र फिर्यादी (Crime) दिल्या आहेत. पोलिसांनी नगरसेवक आणि नूतन बाजार समिती संचालकांसह २० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. (Panic broke out in front of house of defeated candidate in Sanglit Bazar samiti)

उषाताई फोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा सतीश फोंडे हा बाजार समिती निवडणुकीत हमाल-तोलाईतदार गटातून शेतकरी परिवर्तन पॅनेलतर्फे उभा होता. त्या निवडणुकीत त्याचा पराभव होऊन मारुती बंडगर विजयी झाले. विजयानंतर संजयनगरमधून बंडगर समर्थकांनी मिरवणूक काढली. दुपारी दोनच्या सुमारास बेकायदेशीर जमाव जमवून मोटारसायकलवरून त्यांच्या घरासमोर आले. हातात घातक हत्यारे घेऊन मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ करत त्यांच्या घरासमोर नारळ फोडून निघून गेले.

Sangli Bazar Samiti
Khed Bazar Samiti Election : ग्रामपंचायत सदस्याचा बाणेदारपणा : बाजार समिती निवडणुकीत मिळालेली पाकिटे केली परत; पैसे दान केले!

प्रतिभा माने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दुपारी अडीचच्या सुमारास संशयितांनी संगनमताने बेकायदेशीर जमाव जमवून माने यांच्या घरासमोर येऊन हातात धारदार चाकू, तलवार, कोयते घेऊन घराच्या गेटमध्ये घुसून दारात येऊन शिवीगाळ करत ‘दिप्या कुठे आहे, त्याला मस्ती आली आहे. नाही सापडला तर त्याला हुडकून ठार करतो,’ अशी धमकी देत निघून गेले.

Sangli Bazar Samiti
Kolhapur News : 'कोरेसाहेब, बड्या धेंडांना तिकिटं; मग कार्यकर्त्यांनी काय करायचे?....बंटीसाहेब ‘पीए’ला आवरा'

प्रतिभा माने आणि उषाताई फोंडे यांच्या फिर्यादीनंतर संजयनगर पोलिसांनी रात्री उशिरा नगरसेवक मनोज सरगर, बाजार समितीचे नूतन संचालक मारुती बंडगर, बाळू बंडगर, संदीप बाळू बंडगर, प्रदीप बाळू बंडगर यांच्यासह अनोळखी २० जणांवर गुन्हा दाखल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com