योग्य माणसाला पांडुरंग नक्कीच आषाढीच्या पूजेसाठी बोलावणार

दिंडीचे प्रस्थान होण्याआधी पालखी पूजन खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांच्या हस्ते करण्यात आले.
Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe PatilParesh Kapse

राहुरी ( जि. अहमदनगर ) - भागवत संप्रदायातील संतांचे चरित्रकार म्हणून संत कवी महिपती महाराज ताहराबादकर यांची ख्याती आहे. महिपती महाराज यांच्या दिंडीचे आज ताहराबाद ( ता. राहुरी ) येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्तान झाले. दिंडीचे प्रस्थान होण्याआधी पालखी पूजन खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री संत कवी महिपती महाराज ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र साबळे यांच्यासह ट्रस्टचे सर्व विश्वस्त व मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी आषाढी वारी व राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ( Pandurang will definitely invite the right person for Ashadi worship )

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, "पंढरीचा पांडुरंग नेहमी योग्य माणसाला आषाढीच्या पूजेसाठी बोलावत असतो. यावर्षीही योग्य माणसाच्या हस्तेच पंढरीच्या पांडुरंगाची पूजा होईल. याबाबत सर्वांनी निश्चिंत राहावे. हे ठरवणारे आपण नाही तर पांडुरंगच आहे," असे सांगत त्यांनी महाराष्ट्रात सत्तांतराचे संकेत दिले.

Dr. Sujay Vikhe Patil
सुजय विखे पाटील आणि माझे बोलणे झाले आहे; भविष्यात ते धनुष्यबाण हाती घेतील : नार्वेकरांची गुगली

ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बघता वारकऱ्यांनी यामध्ये लक्ष न देता पांडुरंगाचा धावा करावा. पांडुरंगाच्या मनामध्ये जो असतो त्या माणसाच्या हस्तेच दरवर्षी आषाढीची महापूजा होत असते. यावर्षी देखील योग्य माणसाला पांडुरंग नक्कीच आपल्या सेवेसाठी बोलावून घेणार आहे. यात कुणी शंका बाळगू नये वारकऱ्यांसाठी करता येईल. तेवढा सर्व सुविधा करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत," असे त्यांनी सांगितले.

"कोरोनाच्या महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून दिंडी सोहळा बंद होता, मात्र आता या वर्षी पांडुरंगाला भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी जात आहेत. या वारकऱ्यांची व्यवस्था व्हावी म्हणून गेली काही दिवसांपासून मी प्रयत्न करत आहे," असे आश्वासन त्यांनी दिले.

Dr. Sujay Vikhe Patil
सुजय विखे पाटील म्हणाले, ऊस लागवडीबाबतचे निर्बंध उठविल्याने शेतकऱ्यांसमोर संकट

"नगर-मनमाड रस्ता व नगर-करमाळा रस्त्याचे काम सुरू असल्याने अडथळ्याचा बनला आहे. मी केंद्राकडून तातडीने 13 कोटी रुपये मंजूर करून घेऊन दिंडीसाठी ज्या ठिकाणी काम सुरू आहेत. त्या ठिकाणी तातडीने मुरुमीकरण करून मार्ग उपलब्ध करून देणे संदर्भामध्ये सूचना केलेल्या आहेत. खांदलेले रस्ते त्यामुळे दुरुस्त होऊन या मुरूमीकरण केलेल्या रस्त्यावरून दिंडी जाऊ शकते. त्यामुळे अनेक अपघात होण्याचे वाजतील त्याच बरोबर वारकऱ्यांना देखील जाण्यासाठी योग्य मार्ग मिळेल," असे सुजय विखे पाटील म्हणाले.

Dr. Sujay Vikhe Patil
राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधीने नगर-मनमाड रस्त्याच्या कामात मागितली टक्केवारी : डॉ. सुजय विखे पाटील

यावेळी विखे यांनी ताहराबाद येथील पालखी मार्गासाठी 25 लक्ष रुपये देण्याचे घोषित केले. यावेळी ताहाराबाद गावचे सरपंच नारायण झावरे यांनी प्रास्तविक केले. यावेळी संत कवी महिपती महाराज ट्रस्टचे उपाध्यक्ष अविनाश कांबळे, ज्येष्ठ विश्वस्त आसाराम ढुस, सुरसिंगराव पवार, मच्छिंद्र कोहकडे, शिवाजी कोळसे, दत्तात्रेय जगताप, अशोक हांडे, संजय कांबळे, रमेश नालकर, बाबासाहेब वाळुंज, अॅड. अशोक किंनकर, श्रीकृष्ण कांबळे, संस्थानचे सचिव बाळासाहेब मुसमाडे, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक केशवराव कोळसे, बाळकृष्ण कोळसे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com