पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीला मिळणार मुदतवाढ? : औसेकर महाराजांकडे कारभार राहणार

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची उद्या (ता. ३ जुलै) पाच वर्षांची मुदत संपणार आहे.
Pandharpur's Vitthal Mandir&Gahininath Maharaj Ausekar
Pandharpur's Vitthal Mandir&Gahininath Maharaj AusekarSarkarnama

पंढरपूर : पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल रुक्मिणी मंदिर (Vitthal Mandir) समितीची उद्या (ता. ३ जुलै) पाच वर्षांची मुदत संपणार आहे. त्यामुळे नवी समिती अस्तित्वात येणार की, सध्याच्या समितीला मुदतवाढ मिळणार याकडे वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Pandharpur's Vitthal Mandir Samiti to get extension)

Pandharpur's Vitthal Mandir&Gahininath Maharaj Ausekar
उद्धव ठाकरे आजही तुमचे नेते आहेत का..? एकनाथ शिंदेंनी दिले हे उत्तर...

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांपूर्वी कराड येथील भाजप नेते अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. दरम्यान, अतुल भोसले यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून मंदिर समितीचे अध्यक्षपद रिक्त आहे. याच दरम्यान मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर समितीचा कारभार सक्षपणे केला. राज्यात पुन्हा सत्ता बदला झाला आहे. भाजपप्रणित सरकारची सत्ता आली आहे. अशातच मंदिर समितीची मुदत उद्या संपत आहे. परंतु राज्यातील सत्ता संघर्ष अजूनही सुरुच असल्याने इतक्यातरी नवीन समिती गठीत होईल, या विषयी साशंकता आहे. त्यामुळे सध्याच्या मंदिर समितीलाच आणखी काही महिने कारभार पाहावा लागणार, अशी शक्यता आहे.

Pandharpur's Vitthal Mandir&Gahininath Maharaj Ausekar
‘शिवसेनेचे ११ खासदार भाजपच्या संपर्कात’; ‘मातोश्री’वरील बैठकीस तिघांची दांडी

समितीचे अध्यक्षपद रिक्त असल्याने सर्व जबाबदारी ही सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यावर आहे. मागील दोन वर्षापासून औसेकर महाराज यांनी सर्व सदस्य आणि मंदिर व्यवस्थापनामध्ये योग्य समन्वय ठेवून उजवे काम केले आहे. कोरोना काळात मंदिर बंद असतानाही त्यांनी अनेक गरजू लोकांना समितीच्या माध्यमातून मदत केली आहे. मंदिर समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठीही त्यांनी अनेक प्रयत्न केले आहे. दोन वर्षांनंतर आषाढी यात्रा भरणार असल्याने भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त भाविकांना पदस्पर्श आणि मुख दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर समितीने जय्यत तयारी सुरु केली आहे. आषाढीच्या तयारीसाठी सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज मागील काही दिवसांपासून पंढरपुरात तळ ठोकून आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com