पंढरपूरच्या विद्यार्थ्याची पुणे जिल्ह्यातील वसतिगृहात आत्महत्या

पोटात दुखत आहे, असे सांगून कन्हैया काळे हा गुरुवारी सकाळी महाविद्यलयात न जाता रूममध्येच थांबून राहिला होता.
Kanhaiya Kale
Kanhaiya KaleSarkarnama

मंचर (जि. पुणे) : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पहिल्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने वसतिगृहातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली आहे. ही घटना आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात घडली आहे. या प्रकारामुळे अवसरी खुर्दमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (A Pandharpur student committed suicide in a hostel in Pune district)

कन्हैया तानाजी काळे (वय १८, रा. पंढरपूर, जि सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो असवरीच्या शासकीय महाविद्यालयात विद्युत विभागात पहिल्या वर्गात शिकत होता. आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.

Kanhaiya Kale
एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला जोरदार धक्का : ठाण्यातील बडा मासा लावला गळाला

पंढरपूरचा कन्हैया काळे हा अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्युत विभागात पहिल्या वर्गात शिकत होता. ता. १७ आणि ता.१८ ऑक्टोबर रोजी इंग्रजी, विज्ञान व गणित या विषयाची युनिट टेस्ट होती. कन्हैया काळे याला गणित जमत नव्हते, त्यामुळे तो ता. १२ ऑक्टोबर रोजी तणावात होता, असे वसतिगृहात त्याच्यासोबत एकाच खोलीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले. पोटात दुखत आहे, असे सांगून कन्हैया काळे हा गुरुवारी सकाळी महाविद्यलयात न जाता रूममध्येच थांबून राहिला होता. त्यानंतर त्याने सकळी नऊ ते तीन या वेळेत आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Kanhaiya Kale
‘रश्मी शुक्लांनी ६८ दिवस माझा फोन टॅप केला : फडणवीसांना भेटल्या त्याच दिवशी त्यांना क्लीनचिट’

दरम्यान, मंचरचे पाेलिस निरीक्षक सतीश होळकर यांच्यासह पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता त्यावर वरील गोष्ट समोर आली आहे. पोलिसांनी पंचनामा केला आहे. शवविच्छेदन करून कन्हैया काळे याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com