Pandharpur News : ऊस आंदोलनाला हिंसक वळण ; ट्रॅक्टरचे टायर फोडले!

Pandharpur News : चार ट्रॅक्टरचे 40 टायर अज्ञात लोकांनी फोडले.
Pandharpur News
Pandharpur News Sarkarnama

पंढरपूर : ऊसदराच्या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ऊसदर संघर्ष समितीने आंदोलन पुकारले आहे.‌ या आंदोलनाला रात्री पंढरपूर तालुक्यात हिंसक वळण लागले. श्रीपूर येथील वाखरी इथं ऊस घेऊन जाणाऱ्या चार ट्रॅक्टरचे 40 टायर अज्ञात लोकांनी फोडले. यामध्ये ट्रॅक्टर मालकांचे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये जाहिर करावी, या मागणीसाठी ऊसदर संघर्ष समितीच्या आंदोलनची हाक दिली आहे. दोन दिवसांपूर्वी ऊसतोड बंद करून ऊस वाहतूक करू नये, असे आवाहन केले होते. त्यानंतरही ऊस वाहतूक सुरू होती. ही ऊस वाहतूक रोखण्यासाठी, रात्री अज्ञातांनी ट्रॅक्टरचे टायर फोडले आहेत. या प्रकारामुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Pandharpur News
विश्वास बारबोलेंचं अखेर ठरलं : पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार

स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, जनहित संघटना, जनशक्तीसह विविध शेतकरी संघटना एकत्र आल्या असून, ऊसदर संघर्ष समितीची स्थापना केली आहे. या आंदोलनातून ऊस दरासाठी सर्व शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. सोलापूरातील सहकारी आणि खासगी सर्वच साखर कारखानदार एकत्र येऊन ऊसाचा दर ठरवतात. पण ऊस दराच्या प्रश्नांवर कारखान्यांचे अध्यक्ष आपला राजकीय पक्ष, गट, संघटना विसरुन जातात, मग शेतकरी या प्रश्नांवर एकत्र का येऊ शकत नाहीत, असे शेतकरी संघटनांनी म्हटले आहे.

Pandharpur News
karad : ऊसदर जाहीर करा; ऐन दिवाळीत 'बळीराजा'चे खर्डा भाकरी आंदोलन...

काही दिवसांपूर्वी पंढपुरात ऊस दर संघर्ष समितीने घेतलेल्या मेळाव्यात ऊसाला 3 हजार 100 रुपयांचा भाव मिळावा. ऊसाला पहिली उचल 2 हजार 500 रुपयांची मिळावी या अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केली होती. करण्यात आली होती. तोपर्यंत कोणीही ऊस वाहतूक न करऩण्याचे आवाहन केले होते.

सुरुवातीला ठिक-ठिकाणी ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून गांधींगिरी पद्धतीने गुलाब देऊन ऊस वाहतूक थांबवण्याची विनंती आंदोलकांकडून करण्यात आली. पण काल रात्री अचानक या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दुचाकीवरुन आलेल्या तीन ते चार अज्ञात लोकांनी ट्रॅक्टरचे टायर फोडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com