पंढरपूर देवस्थानची धुरा प्रणिती शिंदेंकडे की सोलापूरबाहेरील युवा नेत्याकडे जाणार?

आमदार प्रणिती शिंदे आणि माजी मंत्री म्हेत्रे यांच्याशिवाय सोलापूरच्या कॉंग्रेसमध्ये सध्या तरी कोणतेही सक्रिय माजी मंत्री अथवा माजी आमदार राहिलेले नाहीत
Praniti Shinde
Praniti Shindesarkarnama

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकारातून आणि इच्छेनुसार राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. सरकार आले, मंत्रीमंडळ झाले पण इतर सत्तावाटपाचे गणित कसे असणार? याचे कोडे मात्र अद्यापही कायम आहे. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या सिध्दीविनायक देवस्थानवर आदेश बांदेकरांची नियुक्ती झाली. राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या शिर्डी साई संस्थानवर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची निवड झाली. पण, काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या पंढरपूर देवस्थानवर मात्र का नियुक्ती होत नाही?, ही नियुक्ती का रखडली? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. (Pandharpur Devasthan Samiti's chairmanship will go to Praniti Shinde or young leader from outside Solapur?)

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेना नेते आदेश बांदेकर यांना पूर्वी भाजप शिवसेना सरकारमध्ये आणि आता महाविकास आघाडी सरकारमध्येही सिध्दीविनायक देवस्थानचे अध्यक्ष मिळाले आहे. शिर्डीच्या साई संस्थांनवर कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती झाली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्‍मिणी देवस्थान समितीचे अध्यक्षपद कॉंग्रेसकडे आले आणि सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे यांना ही संधी मिळू शकते, या शक्‍यता सुरु झाल्या. सलग तीन टर्म आमदार होऊनही मंत्रीपदाने हुलकावणी दिलेल्या आमदार शिंदे यांना किमान राज्यमंत्री दर्जाच्या पदावर तरी संधी मिळेल, असा विश्‍वास त्यांच्या समर्थकांना आहे.

Praniti Shinde
ST कर्मचाऱ्यांसमोर बोलताना आमदार राऊतांचा गौप्यस्फोट : ...यामुळेच मी शिवसेना सोडली

सिध्दीविनायकसाठी शिवसेनेने जसे प्रयत्न केले, शिर्डीसाठी राष्ट्रवादीने जसे प्रयत्न केले, तसे प्रयत्न पंढरपूरसाठी कॉंग्रेस करत नाही का?, की महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीपुढे कॉंग्रेसचेच काही चालत नाही? हे प्रश्‍न रखडलेल्या नियुक्तीतून उपस्थित होऊ लगाले आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांच्यानंतर हे पद सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या नेत्याला मिळू शकते? याचा विचार केल्यास ज्येष्ठत्वाच्या मुद्यावर माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचे नाव प्रथम प्राधान्याने समोर येते. सध्या म्हेत्रे प्रचंड अडचणीत आहेत. त्यांच्या मातोश्री लक्ष्मी शुगरने थकविलेल्या एफआरपीसाठी शेतकरी सोलापुरातील कॉंग्रेस भवनसमोर आंदोलनाला बसले आहेत. म्हेत्रे यांच्या या प्रश्‍नात सोलापूरची कॉंग्रेस सध्या त्यांच्या सोबत दिसत नाही. मग पंढरपूर देवस्थानच्या अध्यक्षपदासाठी सोलापूरची कॉंग्रेस म्हेत्रे यांच्यासोबत राहणार का? हा देखील संशोधनाचा विषय आहे. आमदार प्रणिती शिंदे आणि माजी मंत्री म्हेत्रे यांच्याशिवाय सोलापूरच्या कॉंग्रेसमध्ये सध्या तरी कोणतेही सक्रिय माजी मंत्री अथवा माजी आमदार राहिलेले नाहीत, हे कॉंग्रेसचे दुर्देवच म्हणावे लागेल.

Praniti Shinde
मंत्री भरणेंचा मेसेज बाॅक्स फुल्ल झालायं... राज्यभरातील परीक्षार्थी खूष!

कार्तिकीपूर्वी काँग्रेस धाडस दाखवणार का?

पंढरपूरसाठी आषाढी आणि कार्तिकी वारी महत्वाची समजली जाते. कार्तिकी वारी जवळ आली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेसच्या वाट्याला आलेल्या पंढरपूर देवस्थानच्या अध्यक्ष पदावर आपला माणूस बसविण्यासाठी कॉंग्रेस पुढाकार घेणार का? आमदार शिंदे, माजी मंत्री म्हेत्रे असोत की सोलापूर जिल्ह्याबाहेरील युवा किंवा ज्येष्ठ नेत्याला पंढरपूर देवस्थानच्या अध्यक्ष पदावर बसविण्यासाठी कॉंग्रेस आग्रही भूमिका मांडणार का? यावर सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे अस्तित्व आणि भविष्य अवलंबून आहे हे निश्‍चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com