ZP अध्यक्षांवरील टक्केवारीचा आरोप; पंचायत राज समिती म्हणते 'ते आमच्यापर्यंत आलंच नाही!'

झेडपी अध्यक्षांवरील टक्केवारीच्या आरोपांची पीआरसी घेणार साक्ष : चेअरमन रायमुलकर; सीईओंकडून माहिती घेऊन होणार संबंधितांची साक्ष
Solapur ZP
Solapur ZPSarkarnama

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्हा परिषदेचे (ZP) तत्कालीन अध्यक्ष अनिरुध्द कांबळे हे विकास कामे मंजूर करण्यासाठी स्वीय सहाय्यकाच्या माध्यमातून टक्केवारी मागत असल्याचा आरोप तत्कालीन कृषी सभापती अनिल मोटे यांनी केला होता. विधान मंडळाच्या पंचायत राज समितीला (Panchayat Raj) या संदर्भात आज विचारणा केली असता आमच्यापुढे हे प्रकरण आले नव्हते. सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेऊन या प्रकरणात संबंधित विभागाच्या सचिवांची साक्ष घेतली जाईल, अशी माहिती पंचायत राज समितीचे चेअरमन संजय रायमुलकर व समिती सदस्य विक्रम काळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (Panchayat Raj Samiti will take Secretary's testimony percentage allegations on ZP president)

तत्कालीन सभापती मोटे यांनी तत्कालीन अध्यक्ष कांबळे यांच्यावर टक्केवारीचा आरोप केला होता. या आरोपानंतर जिल्हा परिषदेच्या वर्तुळात प्रचंड खळबळ माजली होती. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही हा विषय गाजला होता. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून आपण ईडीकडे तक्रार करणार असल्याचे सुरुवातीला मोटे यांनी सांगितले होते. तसेच, हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. नंतरच्या काळात मात्र मोटे यांनी या प्रकरणी मौन बाळगले.

Solapur ZP
सदाभाऊंनी घेतला बिलाचा धसका...? ‘थ्री स्टार’ हॉटेलमध्ये घरगुती शिदोरीवर केली न्याहरी!

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांवरच जर सभापती टक्केवारीचा आरोप करत असतील तर जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन होते. या संस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. पंचायत राज समिती म्हणून तुम्ही काय कार्यवाही करणार? असा प्रश्‍न आज पंचायत राज समितीला पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. त्यासंदर्भात समितीचे चेअरमन रायमुलकर म्हणाले, ‘‘आमच्यासमोर हा विषय आला नव्हता. परंतु या विषयाची आम्ही माहिती घेऊन संबंधितांची साक्ष घेतली जाईल.

Solapur ZP
महादेव जानकारांनी बटाटे वडे तळले अन्‌ राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंनी हेडलाईन सांगितली...

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) दिलीप स्वामी यांच्याकडे समितीच्या सदस्यांनी या संदर्भात विचारणा केली असता सीईओ स्वामी म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत झेडपी अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक दोषी आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेला पंचायत राज समितीचे सदस्य अनिल पाटील, कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com