BJP : निम का पत्ता कडवा है, पाकिस्तान भडवा है...पाकिस्तानच्या विदेश मंत्र्याचा कराड, साताऱ्यात निषेध

Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल पाकिस्तानचे विदेश मंत्री बीलावल भुट्टो यांनी खालच्या थरावर जाऊन वक्तव्य केले होते.
Karad BJP Andolan
Karad BJP Andolansarkarnama

कऱ्हाड : निम का पत्ता कडवा है... पाकिस्तान भडवा है..., मुर्दाबाद मुर्दाबाद... पाकिस्तान मुर्दाबाद... मोदीजी तुम आगे बडो... हम तुम्हारे साथ है..., भारत माता की जय..., वंदे मातरम... पाकिस्तानच्या वेदेश मंत्र्यांचा धिक्कार असो... अशा घोषणांनी कऱ्हाड (जि.सातारा) येथील दत्त चौकाचा परिसरत दणाणुन गेला. निमित्त होते भाजपने केलेल्या पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांच्या निषेध आंदोलनाचे.

पाकिस्तानचे विदेश मंत्री बीलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल खालच्या थरावर जाऊन वक्तव्य केले. त्याच्या निषेधार्थ आज शनिवारी भाजपच्यावतीने येथील दत्त चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.

भाजपचे प्रदेश चिटणीस अतुल भोसले, सरचिटणीस विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, युवा मोर्चाचे सुदर्शन पाटसकर, मुकुंद चरेगावकर, घनश्याम पेंढारकर, धनाजी माने, उमेश शिंदे, प्रमोद शिंदे, सिमा घार्गे, स्वाती पिसाळ, धनश्री रोकडे, सारिका गावडे, नम्रता कुलकर्णी, नितीन शहा, राजु मुल्ला, विश्वानाथ फुटाणे, श्री. देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Karad BJP Andolan
Sushma Andhare News; भाजप नेत्यांसह वारकऱ्यांनी काढली निषेध दिंडी

साताऱ्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला. साताऱ्यातील पोवईनाका येथे पाकिस्तानचे झेंडे आणि बिलावल भुट्टो झरदारी याचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.

Karad BJP Andolan
Satara News: उदयनराजे म्हणतात, चोरी करणाऱ्यांची बोटे छाटा.. बलात्काऱ्यांचे...

साताऱ्यात भाजपचे नेते धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे ,सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जावळी तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, कराड उत्तर अध्यक्ष महेश जाधव, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, रामकृष्ण वेताळ, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेवक सुनील काळेकर,आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Karad BJP Andolan
Maan : जिहे-कटापूर योजना सौर ऊर्जेवर चालविणार... जयकुमार गोरे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in