Maan News: पडळकरांना महापुरुषांबद्दल खोटा कळवळा; राजमातांचा अवमान होताना ते गप्प का...

Prashant Virkar: समाजाची दिशाभूल करणाऱ्या संधीसाधू, महाभागांना येणाऱ्या काळात धनगर समाज निश्चितच धडा शिकवेल, असाही इशारा प्रशांत विरकर यांनी दिला आहे.
Prashant Virkar, Gopichand Padalkar
Prashant Virkar, Gopichand Padalkarsarkarnama

Maan News : महाराष्ट्र सदनात शिंदे-फडणवीस सरकारने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवत त्यांचा अवमान करत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयंतीचा कार्यक्रम केला. अशावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व धनगर समाजाबद्दल खोटा कळवळा आणणारे आमदार गोपीचंद पडळकर पदाच्या लालसेपोटी सन्मान गहाण ठेवून लाळघोटेपणा करत का गप्प आहेत, असा सवाल राष्ट्रवादी युवकचे माण तालुका अध्यक्ष प्रशांत विरकर यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र सदनात Maharashtra Sadan स्वातंत्र्यवीर सावरकर Sawarkar यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात असलेले पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला करण्यात आले. त्या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम करण्यात आला. त्या ठिकाणी पुतळे असताना देखील कार्यक्रम करता आला असता.

परंतु जाणून बुजून या शिंदे, फडणवीस सरकारने तेथील पुतळे हटवले. हा महाराष्ट्रातील महान व्यक्तींचा अवमान आहे. शरद पवार त्यांच्या कुटुंबियांबद्दल सातत्याने गरळ ओकणारे आमदार गोपीचंद पडळकर अशावेळी का गप्प हाोते.

चौंडी येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमातही श्री. पवार यांच्या घराण्याबद्दल बोलण्यापेक्षा दिल्लीत झालेला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांच्या अवमानाबद्दल त्यांनी सरकारला जाब विचारायला हवा होता.

Prashant Virkar, Gopichand Padalkar
Sharad Pawar News : अशा क्रूरतेमुळे लोकशाही मूल्ये अपमानित; पवारांनी मोदी सरकारला सुनावलं !

त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा किंवा महापुरुषांबद्दलचा खोटा कळवळा आणून पदाच्या लालसेपोटी चाटुगिरी करणे बंद करावे. अशा स्वार्थी व समाजाची दिशाभूल करणाऱ्या संधीसाधू, महाभागांना येणाऱ्या काळात धनगर समाज निश्चितच धडा शिकवेल, असाही इशारा श्री. विरकर यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in