
Ahmednagar News in Marathi
अहमदनगर - अहमदनगरचे नाव बदलून अंबिकानगर करावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे मागणी होत आहे. अशातच आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी नगर करावे या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. या संदर्भात माहिती देताना पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. पडळकर यांच्यावर काल (बुधवारी) कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ( Padalkars demand to make Ahilya Devi Nagar of Ahmednagar: Serious allegations made against Sharad Pawar )
पडळकर म्हणाले, शेकडो हिंदूंचा बळी घेणारा मुंबई बॉम्ब स्फोटातील मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या बहिणी सोबत आर्थिक भागेदारी असणाऱ्या नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये मोगलशाही पद्धतीने पोलिस बळाचा गैरवापर केला. तसेच अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे येण्यापासून रोखले. अहिल्यादेवी जयंती म्हणजे यांना नातवाला लॉन्च करण्याचा इव्हेंट वाटतो का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (Gopichand Padalkar News in Marathi)
ते पुढे म्हणाले की, जेव्हा हिंदुस्थान मुसलमान राजवटीत हिंदूंची मंदिरे लुटली व फोडली जात होती त्यावेळी हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या हिंदू संस्कृतीत प्राण फुंकले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला. तेव्हा तमाम हिंदू लोकांची भावना आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ज्या जिल्ह्यात झाला त्याचे अहमदनगर नाव बदलून त्याचे अहिल्यानगर नामकरण करण्यात यावे. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे, असे त्यांनी सांगितले.
नामांतराला निर्णय घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाही हे दाखवून द्या. स्वाभीमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा आणि होळकरशाहीचा सन्मान करा, ही आपल्याकडून अपेक्षा आहे. बहुजन समाज जागा झाला आहे. तो संघटित झाला आहे, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.