काष्टी सोसायटीच्या सभेत गोंधळ : सत्ताधारी विरोधक भिडले

काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) यांच्या गटाने भाजपचे आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांच्या गटाचा पराभव करत सोसायटीची सत्ता हाती घेतली.
Kashti Society
Kashti Societysarkarnama

Pachpute Vs Nagawade : काष्टी विविध कार्यकारी सेवासोसायटीची सभेची निवडणूक याच वर्षी झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) यांच्या गटाने भाजपचे आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) यांच्या गटाचा पराभव करत सत्ता हाती घेतली. या सोसायटीची काल ( शुक्रवारी ) झालेल्या सर्वसाधारण सभेत या राजकीय वादाचे पडसाद दिसून आले.

सहकारमहर्षी काष्टी सेवा संस्थेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला. संस्थेने अहवाल प्रसिद्ध न केल्याने कारभारावर चर्चा कशी करणार, असा प्रश्न सभासदांमधून आल्यावर, त्याबाबतची तांत्रिक अडचण सांगत अध्यक्ष राकेश पाचपुते यांनी ही सभा काही दिवसांसाठी तहकूब करण्याची घोषणा केली. मात्र, त्यानंतर माजी अध्यक्ष भगवानराव पाचपुते यांनी बोलण्याचा प्रयत्न केल्यावर गोंधळ सुरू झाला आणि यातच गुद्दागुद्दी, धक्काबुक्कीचे प्रकार घडले.

Kashti Society
सुना संपविणार नागवडे कुटुंबाचा राजकीय सासुरवास..

काष्टी सेवा संस्थेत काही महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले. भगवानराव पाचपुते यांच्या ताब्यातील ही संस्था माजी अध्यक्ष कैलास पाचपुते गटाने काढली. त्यानंतर संस्थेत भगवानराव यांच्या काळातील कारभार तपासण्याचे काम संचालक मंडळ करीत आहे, अशी चर्चा होती. त्यातच आज झालेल्या सर्वसाधारण सभेत मागील कारभाराचा अहवालच प्रसिद्ध न केल्याने खरा गोंधळ सुरू झाल्याचे समजले. अध्यक्ष राकेश पाचपुते म्हणाले, की लेखापरीक्षकाने त्यांचा अहवाल काल संस्थेला दिला. अनेक वेळा पाठपुरावा करूनही तो न मिळाल्याने संस्थेला गेल्या वर्षातील विरोधकांचा कार्यकाळाचा अहवाल छापता आला नाही. त्यामुळे तो अहवाल छापून येईपर्यंत ही सभा तहकूब करण्यात येत आहे.

सभा तहकूब झाल्यावर भगवानराव पाचपुते यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावर सत्ताधाऱ्यांसह काही सभासदांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. सभा तहकूब झाल्याने येथे बोलू नका, पुन्हा सभा होईल त्यावेळी म्हणणे मांडा असे त्यांना सांगितले जात होते. मात्र या गोंधळातच काही लोक अध्यक्षांवर, तर काही विरोधकांवर धावून गेले. त्यामुळे गुद्दागुद्दी व धक्काबुक्कीचे प्रकार घडले. यात एक नेता खाली पडला. मात्र, नंतर सगळ्यांनीच शांत राहण्याचा निर्णय घेत गोंधळ संपविला.

Kashti Society
नगर जिल्ह्यातून फक्त राधाकृष्ण विखेंनाच निरोप : पाचपुते, शिंदे गॅसवर!

अहवाल छापण्यासाठी लेखापरीक्षण अहवालाची गरज नाही. बेरीज-ताळेबंद असला तरी अहवाल देता येतो. माझ्या काळात संस्थेला ४१ लाखांचा नफा आहे. मात्र, तो दडविण्यासाठी अहवाल छापला नाही व सभा तहकूब करण्याचे नाटक झाले.

- भगवानराव पाचपुते, माजी अध्यक्ष.

थांबा, सगळे होईल. अहवालही येईल आणि मागच्या काळातील पांढऱ्या कपड्यात फिरणाऱ्यांची पापेही समोर येतील. सभा तहकूब केल्यावर गोंधळ घालण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. आम्ही मनगटाच्या जोरावर संस्था चालवीत नाही, कारभारातील कागद समोर मांडून सत्य आणि असत्य पटवून देऊ.

- राकेश पाचपुते, अध्यक्ष

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com