पी. एन. पाटील यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड

मागील ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी गट-तट न पाहता शेतकऱ्यांना न्याय दिला.
पी. एन. पाटील यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड
आमदार पी. एन. पाटीलSarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूरचे (Kolhapur) कॉंग्रेसचे (Cogress) आमदार पी.एन. पाटील (MLA P.N. Patil) यांची जिल्हा बँकेवर( District Bank) बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड काळाजी गरज होती. मागील ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी गट-तट न पाहता शेतकऱ्यांना न्याय दिला. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी आमदार पाटील नेहमीच प्रयत्नशील राहिले. असे मत गोकूळ दूधसंघाचे अध्यक्ष विश्वास पाटील (Vishwas patil) यांनी व्यक्त केले.

फुलेवाडी येथील अमृत सभागृहात करवीरमधील सेवा संस्थांच्या ठरावधारकांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती दशरथ माने होते. या मेळाव्याला तालुक्यातील 251 पैकी तब्बल 217 ठरावधारकांनी उपस्थिती लावली होतीं.

आमदार पी. एन. पाटील
'क्रुझवरील 'त्या' दोघांपैकी एक भाजप नेत्याचा मेव्हणा, म्हणून NCBने त्याला सोडले'

जिल्हा बँकेवर 36 वर्ष प्रतिनिधित्व करताना पाटील यांनी पाच वेळा बिनविरोध बाजी मारली आहे. या मेळाव्यालाही तालुक्यातील २५१ पैकी तब्बल २१७ ठरावधारकांनी उपस्थिती लावली होती. तर पाच जणांनी फोनवरून आपला पाठींबा कळवला.

यावेळी बोलताना आमदार पी.एन. पाटील यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या.'' जिल्हा बँकेत नेहमीच शेतकरी हिताचा कारभार केला आहे. अध्यक्ष पदाच्या पाच वर्षात बँकेच्या ठेवी अडीच पटीने वाढवताना नवीन ५४ शाखा काढल्या. अल्पभूधारकांसह भुमीहिनांनाही कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना सात टक्के व्याजाने कर्ज देण्याचा देशातील पहिला निर्णय घेतला होता. कर्मचाऱ्याना बोनस व बँकेची उलाढाल वाढल्याबद्दल एक पगार जादा दिला होता. मुलामुलींचे विवाह,घरगुती वस्तू,पाईपलाईन ,मोटरसायकल साठी कर्ज योजना सुरु करून शेतकऱ्यांच्या विकासाला दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल आहे.’

करवीरचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी म्हणाले,‘करवीर तालुक्यात सेवा संस्था स्थापण करण्यात पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करणे आपले कर्तव्यच आहे.’

तर ‘गोकुळ’ च्या निवडणूकीत सत्तारुढ आघाडीपासून दुरावलेले विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील यांनी आ.पाटील यांना साहेब मी तुमचाच आहे असे सांगून मला तुमच्या सोबतच राहायचे होते. मात्र माझा वाद दुसऱ्यांशी होता. मी सत्ताधारी पॅनेलमध्ये असतो तर पॅनेल आले असते मात्र मी पराभुत झालो असतो, असे सांगत आपण व पाटील एकत्रच असल्याचे स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.