Dudhani Bazar Samiti Vishleshan : भल्या भल्यांना जमलं नाही; ते भाजपच्या सचिन कल्याणशेट्टींनी करून दाखवलं!

सोसायटी मतदारसंघात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे आणि माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या पराभवामुळे काँग्रेसमध्ये नैराश्य येण्याची शक्यता आहे.
Siddharam Mhetre-Sachin Kalyanshetti
Siddharam Mhetre-Sachin KalyanshettiSarkarnama

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची व अटीतटीची झाली. माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मजबूत गडाला भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी हादरे दिले. म्हेत्रेंच्या गडावर प्रथमच भाजपचा झेंडा फडकावून ऐतिहासिक विजय मिळविला. भल्या भल्या व बलाढ्य विरोधकांनासुद्धा जंग जंग पछाडले तरी जे शक्य झाले नाही, ते नवख्या आणि तरुण सचिन कल्याणशेट्टींनी धाडसी नियोजन करून अशक्य ही शक्य करुन दाखविले. अक्कलकोटच्या राजकारणावर याचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. (Outcome of Dudhani market committee will affect the politics of Akkalkot)

निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच दुधनी बाजार समितीची (Bazar Samiti) ही निवडणूक गाजत होती. बाजार समितीवर प्रशासक आणण्यासाठी आमदार कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) प्रयत्नशील होते, तर बाजार समितीची निवडणूक लागून सत्ता मिळवण्यासाठी प्रथमेश म्हेत्रे व माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) प्रयत्नशील होते. म्हेत्रे यांचे होमपिच असल्यामुळे व गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत असल्यामुळे या भागात ‘म्हेत्रे बोले संपूर्ण परिसर डोले' असे वातावरण होते.

Siddharam Mhetre-Sachin Kalyanshetti
Khed Bazar Samiti : खेड बाजार समिती निवडणुकीत ५० कोटींच्या उलाढाली चर्चा; खुद्द आमदार मोहितेंना बसला पाकिट संस्कृतीचा फटका

सहकार क्षेत्रात तालुक्यात माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे बलाढ्य असले तरी माजी राज्यमंत्री म्हेत्रे यांनी अनेक सोसायटीत शिरकाव करून काँग्रेसचे स्थान बळकट केले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत आमदार कल्याणशेट्टी यांच्या गटातील अनेकांनी तालुक्यातील विविध सोसायट्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात शिरकाव केलेला होता.

जेव्हा निवडणूक जाहीर झाली, तेव्हापासून आमदार कल्याणशेट्टी यांनी पडद्यामागून नियोजन सुरू केले. अतिशय बारकाईने मतदारसंघाचा, मतदारांचा, कोणता मतदार फुटून भाजपकडे येऊ शकतो, याचा अंदाज घेतला. दुधनी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील बहुसंख्य मतदार म्हेत्रे बंधू यांना मानणारे असल्याने त्यांनी नियोजन करण्यात थोडेसे दुर्लक्ष केले. दोन्ही बाजूंकडून बहुसंख्य मतदारांना पर्यटनाच्या निमित्ताने राज्याबाहेर नेण्यात आले होते.

Siddharam Mhetre-Sachin Kalyanshetti
Karnataka Assembly Election : सिद्धरामय्यांना काठावर पास करणाऱ्यात बदामीत भाजपची भिस्त मोदींवर

सोसायटी मतदारसंघातील अकराच्या ११ पैकी ११ जागा जिंकून आमदार कल्याणशेट्टी यांनी सहकारात मजबूत पाऊल टाकले आहे. तसेच, सहकार क्षेत्र काबीज करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे. सोसायटी मतदारसंघात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे आणि माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या पराभवामुळे काँग्रेसमध्ये नैराश्य येण्याची शक्यता आहे. माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे दांडगा जनसंपर्क असलेले नेते म्हणून ओळखले जातात; परंतु अलीकडच्या काळात कमी झालेल्या संपर्काचा त्यांना फटका बसत आहे. दुरावलेल्या लोकांना जवळ करून त्यांना बेरजेचे राजकारण करावे लागेल.

म्हेत्रे बंधूंना तालुक्यातील सोसायटींची पुनर्बांधणी व निष्ठावंतांची पारख करून आगामी निवडणुकीला सामोरे जावे लागेल. दुधनी बाजार समितीच्या निवडणुकीत तन, मन व धनाने दोन्ही बाजूने निवडणूक लढल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. काँग्रेसने ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्याचा प्रचार केला, तर भाजपाने ही लढाई घराणेशाहीच्या विरुद्ध असल्याचा प्रचार केला.

Siddharam Mhetre-Sachin Kalyanshetti
Mangalveda Politic's : माढ्याच्या सावंतांची मंगळवेढ्यात एन्ट्री : भालके गटाच्या झेडपी मतदारसंघात राजकीय पेरणी

आमदार कल्याणशेट्टी यांनी कोणतेही आरोप-प्रत्यारोप न करता अत्यंत बारकाईने निवडणुकीसंदर्भातील नियोजन केले होते. सिद्धाराम म्हेत्रे व आमदार कल्याणशेट्टी यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे प्रथमच टाळलेले होते. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या पाठिंब्याचा फायदा आमदार कल्याणशेट्टी यांना सुद्धा झाला.

या ऐतिहासिक विजयामुळे आमदार कल्याणशेट्टी यांचे राजकीय वजन वाढले असून माजी राज्यमंत्री म्हेत्रे यांच्या राजकिय प्रतिष्ठेला धक्का पोचला आहे. कार्यकर्त्यांची पुन्हा मोट बांधून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी सिद्धाराम म्हेत्रे यांना भरपूर प्रयत्न करावे लागतील. मिळालेल्या विजयाचा प्रभाव आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीपर्यंत कल्याणशेट्टी यांना टिकवावा लागणार आहे. एक मात्र खरे की आगामी काळात आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com