'पांडुरंगानं माझं म्हणणं ऐकलं; आमचा मुख्यमंत्री आषाढीला पूजेला येतोय!'

वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाला शक्य असेल त्या सर्व सुविधा देण्याची सूचना करण्यात आली आहे.
Samadhan Autade
Samadhan AutadeSarkarnama

सोलापूर : कार्तिकी एकादशीला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत मला स्थानिक आमदार म्हणून पूजेचा योग आला. त्यावेळी मी पांडुरंगाला साकडं घातलं होतं की, येणाऱ्या आषाढीला आमच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होऊ दे. पांडुरंगाने आमचं म्हणणं ऐकलं आणि नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आषाढीच्या पूजेला येत आहेत, असा दावा पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांनी केला आहे. (Our Chief Minister is coming to worship Ashadhi : Samadhan Avtade)

आषाढी वारीच्या तयारीबाबत बोलताना स्थानिक आमदार आवताडे यांनी वरील दावा केला आहे. ते म्हणाले की, कोरोनाच्या दोन वर्षांच्या महामारीनंतर यंदा मोठ्या प्रमाणात वारी भरली आहे. पंढरपुरात तब्बल १५ ते २० लाख वारकरी दाखल झाले आहेत. प्रशासनाने सर्व काही तयारी केली आहे. विशेषतः आरोग्याच्या सुविधांबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Samadhan Autade
आढळरावांना पुण्यातून लढविण्यास जिल्हाप्रमुखांसह शिवसैनिकांचा विरोध

पावसामुळे वारकऱ्यांचे थोडे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाला शक्य असेल त्या सर्व सुविधा देण्याची सूचना करण्यात आली आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा नगरपालिकेसंदर्भात बोलताना आवताडे म्हणाले की, या दोन्ही नगरपालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच, जिल्हा परिषदेतही चांगल्या जागा मिळविण्याची आमची आकांक्षा असणार आहे, त्यामुळे आगामी काळात जिल्हा भाजपमय करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे आमदार समाधान आवताडे यांनी स्पष्ट केले.

Samadhan Autade
प्रसाद सावंतांना मिळाले निष्ठेचे फळ : ठाकरेंनी सोपवली माथेरानची जबाबदारी!

दरम्यान, कार्तिकी एकादशीला घातलेले साकडं पांडुरंगानं ऐकलं आणि भाजप-शिवसेना युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढीच्या महापूजेला येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवेढ्यात सध्या दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. त्या निवडणुकीतही समाधान आवताडे यांना पांडुरंग पावणार का, असा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com