चाकरमान्यांसाठी 25 ऑगस्टपर्यंत मुंबई-पुणे महामार्गाची दुरुस्ती करण्याचे आदेश

मुंबई-गोवा महामार्गासंदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांनी आज तातडीची बैठक घेतली.
Ganesh festival in Konkan
Ganesh festival in KonkanSarkarnama

Government of Maharashtra : महाराष्ट्रातील गणेशोत्सव सण हा जगभर प्रसिद्ध आहे. यात कोकणातील गणेशोत्सवाची धुम काही न्यारीच असते. पोटभरण्यासाठी मुंबईत गेलेले चाकरमाने गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी परतात. मात्र कोकणात जाणारा प्रमुख महामार्ग असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. या महामार्गासंदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांनी आज तातडीची बैठक घेतली. या बैठकीत. 25 ऑगस्टपर्यंत या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, खासदार सुनील तटकरे, विनायक राऊत, आमदार प्रवीण दरेकर, भरत गोगवले, नितेश राणे, वैभव नाईक, राजन तेली, योगेश कदम, रविशेट पाटील, शेखर निकम, किरण पावसकर, राजन साळवी, अनिकेत तटकरे, आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) एस. एस. साळुंखे, सचिव (बांधकाम) पी. डी. नवघरे, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) संतोष शेलार, कोकण विभागाचे मुख्य अभियंता एस. एन. राजभोग, रायगडच्या वरिष्ठ अभियंता सुषमा गायकवाड आदी उपस्थित होते.

Ganesh festival in Konkan
रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी केली 'दिवाळी' साजरी

मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा रस्तेमार्ग प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी कोकणातील रस्त्यांची दुरस्तीचे कामे 25 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. सध्या या महामार्गावर खड्डे भरण आणि दुरस्तीची कामे कंत्राटदारांकडून सुरू आहेत. ही कामे अधिक जलद गतीने होण्यासाठी आवश्यकतेनुसार जास्तीत जास्त कंत्राटदारांकडून करून घ्या, आणि पूर्ण ताकदीने आणि युद्धपातळीवर काम करा, अशा सूचना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या.

Ganesh festival in Konkan
कनेक्शन लूज की टाईट.. रवींद्र चव्हाण यांनी दिले हे उत्तर!

ते पुढे म्हणाले की, मुंबई गोवा महामार्गाच्या दुरस्तीसंदर्भात उपस्थित सर्व आमदार आणि खासदार यांनी आपापल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत सूचना केल्या असून या सूचनांचा सकारात्मक विचार करून त्यावर तात्काळ आणि जलदगतीने निर्णय घेऊन काम करण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या. याच बरोबर संपूर्ण महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी जास्तीत जास्त ट्रॅफिक वॉर्डन तैनात करून वाहतूक व्यवस्थापन सुरळीत ठेवण्याचे आदेशही वाहतूक विभागाला देण्यात आले. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे ज्या ज्या कंत्राटदारांकडे देण्यात आली आहे, त्यांच्या कामावर नजर ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील एक अभियंता नेमून देऊन या दोघांचीही नावे शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com