माजी सदस्यांना हवी जिल्हा नियोजनच्या बैठकीत सहभागी होण्याची संधी

अहमदनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक उरकण्याचा घाट घातला जात आहे.
Ahmednagar ZP
Ahmednagar ZPSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आतच जिल्हा नियोजन समितीची बैठक उरकण्याचा घाट घातला जात आहे. या बैठकीत आपल्यालाही सहभागी करून घ्यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्यांमधून केली जात आहे. ( Opportunity for former members to participate in district planning meetings )

जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ 20 मार्चला संपलेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर प्रशासकराज आलेले आहे. जिल्हा परिषदेप्रमाणे या सदस्यांची आता जिल्हा नियोजन समितीवरील नियुक्तीही रद्द झालेली आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या आगामी बैठकीला जिल्हा परिषदेचे 32 सदस्य नसणार आहेत. या बैठकीला आम्हाला उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या माजी सदस्यांमधून होत आहे. ही बैठक आगामी पंधरा ते वीस दिवसांत होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या परवानगीने ही बैठक होणार आहे.

Ahmednagar ZP
नगर जिल्हा परिषद !  12 कोटीं मिळाले, घेणार 45 रुग्णवाहिका 

बैठकीला कमी वेळ लागणार

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला नेहमीपेक्षा कमी वेळ लागणार आहे. प्रत्येक सभेला जिल्हा परिषदेचे सदस्य निधीसह विविध प्रश्न उपस्थित करून पालकमंत्र्यांसह सर्वाधिक निधी मिळण्यासाठी प्रयत्न करायचे. त्यामुळे सभेला जास्त वेळ लागत होता. मात्र, जिल्हा परिषदेचे सदस्य सभेला उपस्थित राहणार नसल्याने बैठकीला कमी वेळ लागणार आहे.

Ahmednagar ZP
मराठा समाजाला फसविले... ओबीसींचेही आरक्षण घालविले : विखेंची बोचरी टीका

समितीचे संख्याबळ

जिल्हा परिषद सदस्य : 32

महानगरपालिका : 3

नगरपालिका : 4

संक्रमित नगरपालिका : एक

शासकीय नियुक्त : 14

खासदार : दोन

आमदार : 13

Ahmednagar ZP
हिंदू हा शब्द गुलामीचे प्रतीक, आताच झुगारा : लक्ष्मण माने

जिल्हा परिषदेची नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येईपर्यंत जुन्यांना काम करण्याची संधी द्यावी, निवडणुका लागल्या नाहीत, हा सदस्यांचा दोष नसून सरकार व निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी सदस्यांना समितीच्या बैठकीला उपस्थित राहू दिले पाहिजे.

- राजेश परजणे व जालिंदर वाकचौरे, माजी सदस्य, जिल्हा परिषद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com